शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:37 IST

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात

थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर येथून सुरुवात केली. वांशिक हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे वचन त्यांनी या वेळी दिले. ‘आम्हाला तुमची वेदना समजते; सौहार्द, शांतता परत आणू,’ अशी फुंकर राहुल गांधी यांनी घातली. मणिपूरची राजधानी इंफाळच्या दक्षिणेला असलेल्या थौबलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधींनी, ‘कदाचित भाजप आणि आरएसएससाठी मणिपूर हा भारताचा भाग नव्हता,’ अशी टीका केली. ही यात्रा ६,७१३ किमी अंतर कापून १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा क्षेत्र आणि ११० जिल्ह्यांतून जाईल. यात्रेचा ६७ दिवसांनी २० मार्च रोजी मुंबईत समारोप होणार आहे.

कट्टरतावादी शक्तींशी आमचा लढा : खरगेमल्लिकार्जुन खरगे यांनी यात्रेच्या बसचे अनावरण केले. ते म्हणाले, ‘काँग्रेस सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समानतेच्या बाजूने आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आणि कट्टरतावादी शक्तींशी लढा देण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढण्यात येत आहे. आमचे नेते शांततेच्या संदेशासाठी घरोघरी फिरत आहे, याचा मला अभिमान आहे.’ 

काँग्रेसने आपल्या नेत्यांना न्याय द्यावा : भाजपमुंबई दक्षिणचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी पहाटे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला फटकारताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयवीर शेरगील म्हणाले की, ‘काँग्रेसची ‘तोडो यात्रा’ सुरू झाली आहे.’ भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ‘काँग्रेसने न्याय यात्रा काढण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांना न्याय द्यावा.’

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा