नवी दिल्ली : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशकांत देशात स्वयंपाकाच्या गॅसची १३ कोटी कनेक्शन देण्यात आली होती, पण गेल्या चार वर्षांत आमच्या सरकारने १० कोटी स्वयंपाकाच्या गॅसची कनेक्शन दिली असून, त्यात गरीब महिलांना स्वयंपाकाच्या गॅसच्या दिलेल्या ४ कोटी मोफत कनेक्शनचाही समावेश आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.स्वयंपाकघरातील धुरापासून महिला व मुलांना होणारा त्रास दूर करण्यासाठीच सरकारने ही पावले उचलली आहेत असेही त्यांनी सांगितले. गोवऱ्या, लाकूडफाटा जाळून आपली आई स्वयंपाक बनवत असताना होणाºया धुरापासून कसा त्रास होत असे, याच्या बालपणीच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला.
आम्ही चार वर्षांत १0 कोटी गॅसची कनेक्शन्स दिली , मोदी यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:17 IST