शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 06:05 IST

Farmers Protest : सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली.

-   विकास झाडे 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात कायद्यामध्ये ८ सुधारणा करण्याची तयारी दर्शविलेली  आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून, आमच्यावर केंद्र सरकारने लादलेले तिन्ही कृषी कायदे नको आहेत, शिवाय ‘एमएसपी’ कायदा करावा, अशी आमची ठोस मागणी असल्याचे पत्र आज संयुक्त किसान मोर्चातर्फे सरकारला पाठविण्यात आले आहे.सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली. तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकारला उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले की, सरकार सातत्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. आतापर्यंत मंत्रिगटासोबत झालेल्या बैठकीत कायदे मागे घ्यावेत, हीच ठोस भूमिका शेतकऱ्यांनी मांडली होती. सरकारकडून मात्र जे प्रस्ताव येतात, त्यात कायद्यात सुधारणा करण्याबाबत चर्चा करू, असे सांगितले जाते.आंदोलनाच्या २८व्या दिवशीही आंदोलन आक्रमक करण्यावर शेतकरी ठाम असल्याचे दिसून आले. बहुतांश शेतकऱ्यांनी दिवसभर उपवास केला. दुसरीकडे आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन, त्यांना ३,१३,३६३ शेतकऱ्यांचे कायद्याला समर्थन असल्याचे पत्र दिले. या शिष्टमंडळाने एक लाख गावांतून या स्वाक्षऱ्या गोळा केल्या असल्याचा दावाही केला आहे.  

रक्ताने लिहिले पत्र!तराई किसान संघटनेचे अध्यक्ष तजिंदर सिंह यांनी मंगळवारी रक्ताने पत्र लिहून एक दिवस उपवास करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यास बुधवारी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

आय लव्ह किसान!आज शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांवर ‘आय लव्ह किसान’ लिहिलेले स्टिकर लावण्यात आले. विजय हिंदुस्थानी यांनी शामली ते युपी गेटपर्यंत कडाक्याच्या थंडीत अंगावरील शर्ट काढून छातीवर हे स्टिकर लावून लक्ष वेधले.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घ्या! - स्टॅलिनशेतकरी महिन्याभरापासून थंडीत आंदोलन करीत आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायला पाहिजे होते, याकडे डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी लक्ष वेधले.

टीएमसीचे खासदार सिंघू सीमेवर!  प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच खासदारांचे शिष्टमंडळ सिंघू सीमेवर पाठविले. यात डेरेक ओ ब्रायन, शताब्दी रॉय, प्रसून बॅनर्जी, प्रतिमा मंडल आणि मोहम्मद नदीमुल हक यांचा समावेश होता.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली