शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

WB Election 2021: पंतप्रधान मोदी राहणार बांगलादेशात, परिणाम होणार बंगालच्या निवडणुकीवर; असा आहे भाजपचा 'प्लॅन B'!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 03, 2021 1:51 PM

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत. (WB Election 2021)

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या काळात हा पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता.आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत.

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Narendra Modi) 26-27 मार्चला बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोना महामारीच्या काळात हा पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश (Bangladesh) दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत. 27 तारखेला मोदी मतुआ समाजाशी संबंधित असलेल्या काही ठिकानांना भेटी देतील. निवडणुकीदरम्यान बंगालमधील 70 हून अधिक जागांवर हाच मतुआ समाज महत्वाची भूमिका बजावतो. (Prime Mnister Narendra Modi Bangladesh visit may effect west bengal assembly election)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं लिहितं तरी कोण?; अखेर उत्तर मिळालं

पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्‍मस्‍थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील. यावेळी बनगावचे भाजप खासदार आणि मतुआ समाजाचे प्रतिनिधी शांतनू ठाकूरही मोदींच्या सोबत असण्याची शक्यता आहे. शांतनू हे हरिचंद्र ठाकूर यांचे वंशज आहेत. याच बरोबर मोदी मतुआ समाजाच्या नागरिकतेसंदर्भातही काही घोषा करण्याचा शक्यता आहे.

पंतप्रधा मोदींची मतुआ मठाला भेट -2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मतुआ समाजाच्या 100 वर्षांपूर्वीच्या मठात जाऊन बोरो मां यांचे दर्शण घेतले होते. भाजपने बोरो मां यांचे नातून असलेले शांतनू ठाकूर यांना आपले उमेदवार केले होते आणि भाजप पहिल्यांदाच बोंगन लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकला होता. याच पद्धतीने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह डिसेंबरमध्ये जेव्हा पश्चिम बंगालमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी मतुआ समाजाच्या व्यक्तीच्या घरीच भोजन केले होते. 

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

बंगालच्या राजकारणात मतुआ समाज महत्वाचा - पश्चिम बंगालच्या राजकारणात मतुआ समाज अत्यंत महत्वाचा आहे. आदिवासी आणि अनुसूचित जाती-जनजातीच्या लोकांवर लक्ष ठेऊन आपले मिशन-200 पूर्ण करण्याची भाजपची इच्छा आहे. 2011च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातीच्या समाजाची लोकसंख्या जवळपास 1.84 कोटी आहे. तर यात 50 टक्के लोक मतुआ समाजाचे आहेत.

भाजपने आणलेला CAA कायदाही मतुआ समाजाच्या हिताचा आहे. हा कायदा लागू झाल्यास या समाजाच्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. विशेष म्हणजे भाजपही येथील विधानसभा निवडणूक प्रचारात या मुद्द्याचा वापर करताना दिसत आहे. यामुळे मोदींच्या या बांगलादेश दौऱ्याचा बंगालच्या निवडणुकीवरही थेट परिणाम पडण्याची शक्यता आहे.

गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशElectionनिवडणूक