शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 6, 2015 03:31 IST

तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे.

चेन्नई : तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे. परंतु काही भागात अजूनही पाणी साचले आहे.दरम्यान लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी आज शहर आणि त्यालगतच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली आणि प्रशासनाला गरज वाटेल तोपर्यंत लष्कराचे बचाव अभियान सुरूच राहील, असे आश्वासन दिले. सरकारच्या माहितीनुसार १ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किमान २४५ लोकांचा बळी घेतला. मंगळवारी शहरातील काही भागात पूर आल्याने परिस्थिती चिघळली होती. पुरामुळे रस्ते, रेल्वेमार्ग उद्ध्वस्त झाले तर विमानतळही बंद करावे लागले होते. विद्युत आणि दूरध्वनी सेवा ठप्प पडून लाखो लोक अडकले होते. कोट्टापुरम, मुदीचुर आणि पल्लीक्करनईसारखे अनेक भाग अजूनही पाण्याखालीच असून असंख्य नागरिक घरांच्या छतावर आश्रयाला आहेत. दरम्यान शहरातील काही एटीएम आणि पेट्रोलपंप सुरू झाले असून तेथे लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. इंधन पुरवठा पुढील दोन दिवसात सामान्य होईल तसेच रविवारी राज्यांमधील बँका सुरू राहतील,अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. (वृत्तसंस्था)एनडीआरएफने १६,००० लोकांना वाचविले तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि राज्याच्या अन्य भागात आलेल्या पुरात मदत आणि बचाव मोहिमेअंतर्गत एनडीआरएफने आतापर्यंत १६,००० वर लोकांचे जीव वाचविले असल्याचे दलातर्फे सांगण्यात आले. दलाच्या २०० नौकांसह ५० पथके बचाव कार्य करीत आहेत.दलाचे महासंचालक ओ.पी. सिंग यांनी सांगितले की, २० नवी पथके बचाव कार्यात सहभागी करण्यात आली असून जवळपास १६०० जवान हे कार्य करीत आहेत. लष्कराने ५,५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविलेलष्कराने आतापर्यंत ५,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून तांब्रम, उरापक्कम, मन्निवक्कम, मुदीचेऊर आणि इतर क्षेत्रात लष्कराची ५० पथके बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरूपुरात वेढलेल्या चेन्नई विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरू झाली आहेत. पुरामुळे येथील हवाई वाहतूक बुधवारपासून बंद होती. प्रवासी विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली.विमानतळाच्या तळघरात अजूनही पाणी साचले असून टर्मिनल इमारतीतील विद्युत पुरवठा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही.