शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रद्द नोटा जमा करण्याचा मार्ग कायमचा बंद!, अर्थ सचिवांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 02:25 IST

केंद्र सरकार यापुढे नोटाबंदीच्या निर्णयाने रद्द करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही नवी खिडकी उघडणार नाही, असे गुरुवारी अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकार यापुढे नोटाबंदीच्या निर्णयाने रद्द करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही नवी खिडकी उघडणार नाही, असे गुरुवारी अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.रिझर्व बँकेने बुधवारी सादर केलेल्या वार्षिक अहवालानुसार, नोटाबंदीने रद्द केलेल्या ९९ टक्के नोटा विविध बँकांमध्ये नियोजित कालावधीत जमा झाल्या आहेत. १६ हजार ५0 कोटी रुपयांच्या ज्या उर्वरित नोटा बँकेत जमा झालेल्या नाहीत त्या यापुढे जमा होण्याची अथवा नव्या चलनात बदलून मिळण्याची शक्यता नाही, असा खुलासा अर्थ खात्याचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव एस.सी. गर्ग यांनी केला.नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांमध्ये जमा झालेली जुन्या नोटांमधील बरीच रक्कम दीर्घकाळ पडून पडून होती. भारतीय चलनी नोटा भूतान, नेपाळसारख्या देशात व्यवहारात असतात. नोटाबंदीनंतर या देशांकडून जुन्या नोटा रिझर्व बँकेत जमा होणे बाकी होते.जमा झालेल्या ९९ टक्के नोटांमध्ये त्यांचा समावेश आहे की नाही, त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. तथापि रद्द केलेल्या नोटा बदलून देण्यासाठी यापुढे कोणतीही खिडकी उघडली जाणार नाही, हे अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव एस.सी. गर्ग यांनी स्पष्ट केले असल्याने या विषयावर कायमचा पडदा पडला आहे.केंद्र सरकारला अर्थसंकल्प तयार करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रिझर्व बँकेने आर्थिक वर्ष २0१६-१७साठी ४४ हजार कोटींचा सरप्लस डिव्हिडंड अपेक्षित धरला होता. मात्र ३0 हजार ६५९ कोटींची रक्कम डिव्हिडंड म्हणून केंद्र सरकारकडे वर्ग केली. 

टॅग्स :Governmentसरकार