पुणे विभागात पाणी टंचाईचे संकट
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
पावसाची दडी : शंभर टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा
पुणे विभागात पाणी टंचाईचे संकट
पावसाची दडी : शंभर टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठापुणे : जुलै आणि आता ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने टंचाईचे संकट गंभीर होत चालले असून, पुणे विभागात आजअखेर टँकरची संख्या शंभरवर गेली आहे. ऐन पावसाळ्यात विभागातील तब्बल अडीच लाख नागरिकांना पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास आगामी काळात गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाने दडी मारल्याने विभागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ही टंचाई काही प्रमाणात कमी होती. परंतु, चालू हंगामात पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळेच ऑगस्ट महिना उजाडला तरी टँकर कमी झालेले नाहीत. जून महिन्यात काही भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे टँकरची संख्या ४८ पर्यंत कमी झाले होती. परंतु, संपूर्ण जुलै आणि आता ऑगस्टचे १८ दिवस कोरडे गेल्याने टँकरची मागणी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दीड महिन्यात टँकरची संख्या पुन्हा शंभरवर गेली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचे अनेक स्त्रोत आटू लागले असून, पावसाची ओढ अशीच कायम राहिल्यास भविष्यात टँकर भरण्यासाठी देखील पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होतील किंवा नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.विभागात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९० गावे आणि तब्बल ५५४ वाड्यावस्त्यांमध्ये आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी १४७ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, सातारा जिल्ह्यातील माण, कोरेगाव, फलटण, सांगली जिल्ह्यात जत, खानापूर तालुक्यातील हजारो लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विभागात सर्वात जास्त ३४ टँकर सांगली जिल्ह्यात पुणे-२५, सातारा २८ आणि सोलापूर जिल्ह्यात १३ टँकर सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यात सन २०१४ मध्ये याच तारखेला तब्बल १७९ टँकर सुरु होते. विभागात सुरु असलेले जिल्हानिहाय टँकर जिल्हाटँकरची संख्यागावे-वाड्याबाधीत लोकसंख्या पुणे२५१३-१५४४५६७६ सातारा२८३५-१६८५६२५३ सांगली३४३३-२३३८७०६८ सोलापूर१३११-१०४१९४५ कोल्हापूर००-०० --- एकूण१००९२-६५४२५०८१५---