शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत अश्लील व्हिडिओ बघणे राष्ट्रविरोधी कृत्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 07:00 IST

कर्नाटकच्या कायदामंत्र्यांचे तर्कट; उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी केले समर्थन

बंगळुरू : विधानसभेत अश्लील (पॉर्न) व्हिडिओ बघणे हे राष्ट्रविरोधी कृत्य नाही, असे अजब तर्कट कर्नाटकचे कायदा व संसदीय कामकाजमंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी लढविले आहे. विधानसभेमध्ये मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघत असल्याबद्दल विद्यमान उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना २०१२ साली मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

सावडी यांच्या समर्थनार्थ मधुस्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. लक्ष्मण सावडी यांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेले वादंग लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या सावडी यांना उपमुख्यमंत्री केल्याबद्दल भाजपला काही लाजशरम वाटते का, असा परखड सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच केला होता.त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मधुस्वामी म्हणाले की, पॉर्न व्हिडिओ पाहणे नैतिकदृष्ट्या चुकीचेच आहे. विधानसभेत सावडी यांच्याकडून असा व्हिडिओ चुकून पाहिला गेला.आपल्या सर्वांच्या हातून चुका होत असतात. मात्र, एखाद्याने केलेल्या चुकीमुळे त्याच्यावर सतत टीका करणे चांगले नाही. लक्ष्मण सावडी यांनी कोणाची फसवणूक केलेली नाही किंवा त्यांच्या हातून एखादे राष्ट्रविरोधी कृत्य घडलेले नाही की ज्यामुळे त्यांना शिक्षा केलीजावी. अमित शहा आमच्यापेक्षा बुद्धिमानच्कर्नाटकचे कायदामंत्री मधुस्वामी म्हणाले की, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी लक्ष्मण सावडी यांच्याकडे असलेले संघटना कौशल्य लक्षात घेऊनच त्यांना उपमुख्यमंत्री केले आहे.च्महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सावडी यांच्या संघटन कौशल्याचा भाजपला खूप मोठा फायदा झाला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आम्हा सर्वांपेक्षा बुद्धिमान आहेत. कोणाचा कुठे व कधी नेमका वापर करून घ्यायचा, हे त्यांना चांगले कळते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकvidhan sabhaविधानसभाsex crimeसेक्स गुन्हाBengaluruबेंगळूर