शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

धो क्या ची नां दी !

By admin | Updated: June 14, 2015 02:35 IST

भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये जाऊन बंडखोर गनिमांचा खात्मा केला. ही कारवाई म्हणजे लष्कराने रचलेल्या डावपेचांचे यश होते.

- पवन देशपांडे

भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये जाऊन बंडखोर गनिमांचा खात्मा केला. ही कारवाई म्हणजे लष्कराने रचलेल्या डावपेचांचे यश होते. या कारवाईने कुरापतखोर शेजारी राष्ट्र हादरले आणि तेथील नेत्यांनी भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. लष्कराची कामगिरी स्तुत्यच होती. देशभरात त्याचे कौतुकही झाले. हे सारं घडून त्याच्या यशाचा विजयोत्सव भारतात शमलेला नसतानाच एक धोक्याची नांदी मिळाली. काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी काढलेल्या रॅलीमध्ये इराक आणि सिरियामध्ये रक्ताचे थैमान घालणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकले. घटना छोटी दिसत असली तरी इसिससारखी घातक संघटना भारतात रुजतेय ही बाब यावरून स्पष्ट होते.काश्मीर खोरे फुटीरवाद्यांनी कायमच धुमसत ठेवले आहे. तेथे कधीच शांतता पसरू न देणे हे त्यांचे पहिले कार्य. कधी पाकिस्तानचे झेंडे फडकवले तर कधी दंगली घडवून आणल्या. कधी पोलिसांवर, सुरक्षारक्षकांवर दगडफेक करून पाकिस्तानी अतिरेकी वृत्तीला खतपाणी घातले. त्यात पाकिस्तानही सातत्याने घुसखोरी करून धरतीवरील हे नंदनवन अशांत करून ठेवत आहे. सीमेपार तळ ठोकून असलेल्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनी काश्मिरातील अनेक तरुणांना फूस लावून देशविरोधी कृत्य करण्यासाठी माथे भडकवण्याचे सातत्याने काम केले आहे. त्यामुळेच फुटीरवाद्यांच्या रॅलीमध्ये अनेकदा पाकिस्तानी झेंडे फडकल्याचे दिसून आले आहे. इसिसचा झेंडा भारतीय भूमीवर फडकण्याची घटना पुन्हा एकदा काश्मिरातच घडली. हे धोक्याचे लक्षण आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात काश्मीरमधील अशाच रॅलीत इसिसचे झेंडे फडकले होते. शुक्रवारी त्याची पुनरावृत्ती झाली. काश्मिरात इसिसचे पाय घट्ट होण्यास सुरुवात झाल्याचे हे भयसूचक चिन्ह आहे. गेल्या महिन्यात कराचीमध्ये इसिस दहशतवाद्यांनी ४५ जणांचा बळी घेतला होता. भारतीय भूमीवर येण्यास त्यांना वेळ लागणार नाही, अशी भीती साऱ्यांनीच त्या वेळी व्यक्त केली होती. दुसऱ्यांना इसिसचा झेंडा फडकण्याची घटना घडल्यानंतर आता ही भीती खरी ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.अनेक भारतीय तरुणांना इसिसने आपल्या जाळ्यात ओढल्याचे उघडकीस आलेले आहे. कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये इसिससाठी लढले, त्यातील एक जण आता भारताच्या ताब्यात आहे. इसिसचे टिष्ट्वटर हँडल करणारा इंजिनीअर बंगलुरूमधून ताब्यात घेण्यात आला होता. त्याचे तर तब्बल १७ हजार फॉलोअर्स होते. त्यात भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स. सोशल माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना जिहादकडे खेचण्याचे काम मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जग जिंकायचं आणि सारी पृथ्वी इस्लामिक बनवायची अशा मनसुब्यांनी निष्पाप जिवांच्या रक्ताचा सडा टाकत सुटलेली इसिस ही संघटना दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. कुर्दीश संघटनेच्या मते इराक आणि सिरियामध्ये इसिसकडे सुमारे २ लाख जिहादी तरुणांची फौज आहे. अमेरिकेच्या सीआयए या तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, इसिसकडे २० ते ३० हजार तरुणांची फौज आहे. याशिवाय इराक आणि सिरियाबाहेर एवढीच फौज कार्यरत असल्याचा अंदाज आहे. ही संघटना केवळ इराक आणि सिरियापुरतीही मर्यादित राहिलेली नसून जगभरात विस्तारत चालली आहे. भारतात त्याची अनेकदा नांदी मिळाली आहे. आतापर्यंत इसिसचे भारतात २० दहशतवादी असल्याची आकडेवारी आहे. पण ती वाढत जाणार ही भीती आहेच. आता आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेची खरी कसोटी आहे. भारतीय तरुणांना फूस लावून इराक-सिरियात ट्रेनिंगसाठी घेऊन जाण्याआधीच अशा स्लिपर सेलचा आणि माथे भडकावू अतिरेक्यांचा शोध लावावा लागणार आहे. अन्यथा ही दहशतवादी संघटना भारताच्या भूमीतही निष्पाप जिवांचा बळी घेत सुटेल. इसिसचे काळे झेंडे फडकवणारे कदाचित हेच सुचवू पाहात असतील. भारतात घुसण्याचा रोड‘मॅप’इसिसने काही दिवसांपूर्वी पाच वर्षांचा प्लॅन तयार केल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण जग काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यासाठी त्यांनी एक ‘मॅप’ही तयार केला आहे. या मॅपमध्ये भारताचा बराच भाग आहे. हा भाग पाकिस्तानच्या सीमेशी निगडित आहे; आणि पाकिस्तानात सध्या ५००हून अधिक इसिसचे दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. यावरूनच सिद्ध होतं की ही सारी घुसखोरी पाकिस्तानच्या भूमीतून होणार. ते रोखण्यासाठी भारतीय लष्कराला कायम सतर्क राहावे लागणार आहे.