नवी दिल्ली : देशात सांप्रदायिक तणाव निर्माण करणारी कुठल्याही व्यक्ती वा संघटनेची गय केली जाणार नाही़ अशांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा सरकारने बुधवारी राज्यसभेत दिला़ गत आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात सांप्रदायिक तणावाच्या घटनांमध्ये घट झाली, तर यावर्षी जानेवारीपासून या संख्येत पुन्हा वाढ झाल्याची माहितीही सरकारने दिली़सांप्रदायिक सद्भावना अतिशय संवेदनशील मुद्दा असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले़ आकड्यांच्या आधारावर सांप्रदायिक सद्भावनेच्या स्थितीचे आकलन करता येणार नाही़ सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल़
दंगलखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा
By admin | Updated: March 5, 2015 01:07 IST