उष्ण लहर कायम दोन दिवस त्रासदायक : पशुपक्षांचे हाल ; ४६ तापमानाची नोंद
By admin | Updated: May 20, 2016 00:41 IST
जळगाव : जिल्हाभरात उष्णलहर कायम असल्याने नागरिकांसोबतच पशुपक्षी व प्राण्यांचे हाल होत आहेत. गुरुवारी जळगाव शहरात ४६ डिग्रीसेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील दोन दिवस त्रासदायक स्थिती राहणार आहे.
उष्ण लहर कायम दोन दिवस त्रासदायक : पशुपक्षांचे हाल ; ४६ तापमानाची नोंद
जळगाव : जिल्हाभरात उष्णलहर कायम असल्याने नागरिकांसोबतच पशुपक्षी व प्राण्यांचे हाल होत आहेत. गुरुवारी जळगाव शहरात ४६ डिग्रीसेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील दोन दिवस त्रासदायक स्थिती राहणार आहे.पक्षांना मूच्छा येण्याचे प्रमाण वाढलेसस्तन प्राण्यांमध्ये आपल्या शरीरातील घामाद्वारे उष्णता बाहेर टाकण्याची नैसर्गिक रचना शरीराची असते. पक्षांच्या शरीरात ही रचना नसते. त्यामुळे बर्याचदा पशु किंवा पक्षी हे सावलीच्या ठिकाणी आपली चोच उघडी ठेवून शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. या दरम्यान त्यांना पाण्याची मात्र आवश्यकता असते. पाणी न मिळाल्यास मग हे पक्षी चक्कर येऊन खाली पडणे, मूर्च्छा येेणे, उपचाराअभावी मृत्युमूखी पडणे असे प्रकार होत असतात. ४५ डिग्री सेल्सीअस तापमानापर्यंत पक्षांना धोका कमी असतो. मात्र त्यानंतर पक्षी मृत्युमुखी पडण्याचे प्रकार होत असतात.रोज दोन तीन पक्षांवर उपचारगेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होऊन उष्णलहर पसरली आहे. त्यामुळे पक्षांना मूर्च्छा येण्याचे प्रमाण वाढले आहे. वन्यजीव संस्थेचे वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे यांच्याकडे रोज दोन ते तीन पक्षी उपचारासाठी येत आहेत. गेल्या आठवडाभरात ९ ते १० पक्षांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या पोपट, तितर, तांबट, तापोळी, होला, कबुतर, कोकीळ, नर कोकीळ या पक्षांना उन्हाचा त्रास जाणवत आहे.दोन दिवसात चौघांचा मृत्यूराज्य हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात उष्णलहर येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी ४७ डिग्रीसेल्सीअसपर्यंत तापमान पोहचले होते. खान्देशात आलेल्या या उष्णलहरीमुळे गेल्या दोन दिवसात चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यात नशिराबाद येथील गोकूळ पाटील, रावेर येथील भागवत जगताप, दहिगाव येथील भरत महाजन, मेहुणबारे येथील रवींद्र महाले यांचा समावेश आहे.पुढचे दोन दिवस त्रासदायकतीन दिवसांपासून सूर्य आग ओकत असताना पुढचे दोन दिवस अजून त्रासदायक राहणार आहेत. शुक्रवारी ४४ तर शनिवारी ४३ डिग्री सेल्सीअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर रविवारपासून तापमान काही प्रमाणात म्हणजे ४२ पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७ जूनपर्यंत तापमान ४० डिग्रीसेल्सीअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.