शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

युद्ध केवळ सीमांवर नाही, देशात अनेक आघाड्यांवर लढले जाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:05 IST

‘मन की बात’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युद्धासारख्या परिस्थितीत आपण खूपच विचार करून बोलले पाहिजे. कारण, याचा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. आजकाल युद्ध केवळ सीमेवर नाही, तर देशातही अनेक आघाड्यांवर सोबतच लढले जाते आणि प्रत्येक देशवासीयास यात आपली भूमिका निश्चित करावी लागते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कारगिल युद्ध म्हणजे भारताच्या मैत्रीच्या मोबदल्यात शेजारी देशाने पाठीत खंजीर खुपसल्याचा परिणाम होता. युद्धाच्या परिस्थितीत जपून बोलले पाहिजे. आमचे आचार, व्यवहार, वाणी, मर्यादा याकडे लक्ष असायला हवे.

मोदी म्हणाले की, कधी-कधी विचार न करता सोशल मीडियावरून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते, ते देशासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे देशातील नागरिकांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडावी. चीनसोबत संघर्ष सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सरकारला लक्ष्य करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वक्तव्यांना महत्त्व आहे.

मोदी म्हणाले की, महात्मा गांधीजींचा मंत्र होता की, आपण जे काही करीत आहोत, त्यामुळे देशातील सर्वात गरीब आणि असहाय व्यक्तीबाबत विचार करायला हवा. त्यामुळे त्या व्यक्तीचे भले होणार की नाही? हाच विचार पुढे नेऊन अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, काही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही हा विचार करायला हवा की, आमचे पाऊल त्या सैनिकांसाठी योग्य आहे की नाही, ज्या सैनिकाने दुर्गम डोंगरी भागात आपल्या प्राणांची आहुती दिली.कोरोनाचा धोका संपला नाहीच्मोदी म्हणाले की, कोरोनाचा धोका संपला नाही. सुरुवातीला होता तेवढाच तो आजही घातक आहे; पण यातून बाहेर पडण्याचा दर अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्यूदरही अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे. यंदा १५ आॅगस्टही कोरोनामुळे वेगळ्या परिस्थितीत होणार आहे.च्स्वातंत्र्यदिनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प करा, काही नवे शिकण्याचा संकल्प करा, आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचा संकल्प करा.अफगाणिस्तानमध्ये ६,००० ते ६,५०० पाकिस्तानी अतिरेकी सक्रियच्संयुक्त राष्टÑ : पाकिस्तानचे सुमारे6,००० ते 6,5००अतिरेकी शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत व त्यातील बहुतांश तहरिक- ए- तालिबान पाकिस्तानचे (टीटीपी) आहेत आणि ते दोन्ही देशांसाठी धोकादायक आहेत, असे संयुक्त राष्टÑांच्या अहवालात म्हटले आहे.च्आयएसआयएस, अल-कायदा व संबंधित व्यक्ती व संस्थांशी संबंधित विश्लेषणात्मक सहाय्यता व प्रतिबंध निगराणी पथकाच्या २६ व्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय उपमहाद्वीपमध्ये अल-कायदा तालिबानच्या अंतर्गत अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद व कंदाहार प्रांतात कारवाया करते.150 ते 200 अतिरेकी या संघटनेत बांगलादेश, भारत, म्यानमार व पाकिस्तानचे आहेत. एक्यूआयएसचा म्होरक्या ओसामा महमूद असून, त्याने आसीम उमर याची जागा घेतली आहे. एक्यूआयएस आपल्या पूर्वीच्या म्होरक्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोठा कट रचत आहे, असेही अहवालात म्हटले आहे.च्अफगाणिस्तानातील सर्वांत मोठी अतिरेकी संघटना टीटीपीने पाकमध्ये अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. संघटनेला जमात- उल- अहरार व इतर संघटनांनी मदत केली आहे.च्टीटीपीचे यापूर्वीचे अनेक अतिरेकी स्टेट इन इराक अँड द लॅवेंट खुरासानमध्ये सामील झालेले आहेत. इतरही अनेक अतिरेकी संघटना मिळून काम करतील, अशी संयुक्त राष्टÑसंघाला शंका आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी