शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध सुरूच राहील

By admin | Updated: April 10, 2017 23:52 IST

काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले. तमिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने तेथे पैशांचा वापर होत असल्याच्या कारणावरून रद्द केली. या निर्णयाचे नायडू यांनी समर्थन केले. पैशांचा वापर होत असल्याचे आरोप होत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करून योग्य निर्णय घेतला, असे सांगून नायडू यांनी काँग्रेसच्या राजवटीत हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले व त्यामुळेच काळा पैसा तयार झाला, अशा शब्दांत काँग्रेसवर हल्ला केला.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार केले जात असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नायडू यांनी फेटाळला. मतदारांनी आपल्याला नाकारल्यामुळे आपला पराभव झाला हे ते स्वीकारत नाहीत. उलट विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे नायडू म्हणाले. चिदंबरम यांची टीका - आर. के. नगर मतदार संघातील पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा हा अपेक्षित परिणाम आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला. - नोटाबंदीच्या निर्णयाने आम्ही काळा पैसा संपवला आहे, असे आम्हाला सांगितले गेले होते. आर. के. नगर मतदार संघात वाटले गेलेले पैसे पांढरे होते का?, असे चिदंबरम टिष्ट्वटरवर म्हणाले. आर. के. मतदार संघात १२ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पैशांचा वापर करून पक्षांनी निवडणूक प्रक्रिया दूषित करून टाकली असल्याचे ते म्हणाले.- ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदी यांनी आता काळापैसा नियंत्रणात येईल व इतरही सकारात्मक परिणाम होतील, असे सांगितले होते, असे चिदंबरम म्हणाले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.