शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
3
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
4
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
5
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
6
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
7
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
8
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
9
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
10
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
11
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
12
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
13
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
14
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
15
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
16
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
17
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
18
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
19
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
20
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन

कायमस्वरूपी कराल वर्क फ्रॉम होम? त्यासाठी चालेल का पगार कपात?; ऐका भारतीयांची 'मन की बात'

By कुणाल गवाणकर | Updated: November 26, 2020 20:16 IST

भारतीयांना आवडतोय वर्क फ्रॉम होमचा पर्याय; घराला वेळ देता येत असल्यानं महिला वर्ग खूष

मुंबई: संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटानं माणसाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. कोरोनाची लस अद्याप तरी मिळाली नसल्यानं धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोना संकटात अनेक जण वर्क फ्रॉम करत आहेत. यापुढेही वर्क फ्रॉम होमचा पर्याय बऱ्यापैकी कायम राहील, असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर मॅवेरिक्स इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.७० टक्के लोकांनी 'हा' उपाय केल्यास नियंत्रणात येईल कोरोनाचा प्रसार; संशोधनातून खुलासाजगातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊ केला आहे. भारतीयांनादेखील हा पर्याय आवडत असल्याचं दिसत आहे. मॅवेरिक्स इंडियानं 'कोविड-१९ अँड बियॉण्ड: ऍन इव्हॉल्विंग पर्सपेक्टिव्ह' नावानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात देशातील ७२० जणांनी सहभाग घेतला. यातल्या ५४ टक्के जणांनी 'वर्क फ्रॉम होम'च्या पर्यायाला पसंती दर्शवली. यातल्याच ३४ टक्के कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम मिळत असल्यास १० टक्के पगार कपात चालेल, असं मत व्यक्त केलं. प्रवासावर होणारा खर्च पगारातून कमी केला तर काय हरकत काय, असा या वर्गाचा मतप्रवाह आहे. कार्यालय गाठण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ प्रवास करणाऱ्या ८१ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम कायमस्वरुपी चालेल, असं मत नोंदवलं. अरे बापरे! कोरोनावरील कोणतीही लस घेतली, तरीही 'हे' साईड इफेक्ट्स दिसणारच?वर्क फ्रॉम होमवर महिला खूषमहिला कर्मचाऱ्यांनादेखील वर्क फ्रॉम होमचा पर्याय उत्तम वाटत आहे. सध्या प्रमाणे काम सुरू असल्यास काहीच हरकत नाही, असं मत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण ५६ टक्के इतकं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या ८० टक्के महिलांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय अतिशय चांगला वाटतो. नव्या पर्यायामुळे काम आणि घराच्या जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थित सांभाळता येत असल्याचं या महिलांचं मत आहे.घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय कर्मचाऱ्यांमधील कोरोनाची भीती घटलीकर्मचाऱ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होत असल्याचं सर्वेक्षण सांगतं. एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर ६६ टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती होती. मात्र आता हेच प्रमाण ३९ टक्क्यांवर आलं आहे. तरुणाईच्या मनातील कोरोनाची भीती ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. चेन्नईतील ७४ टक्के कर्मचारी एप्रिलमध्ये कोरोनाबद्दल चिंतित होते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण थेट २८ टक्क्यांवर आलं आहे. कोलकात्यामधील कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती मात्र वाढली आहे. एप्रिलमध्ये इथल्या ५४ टक्के लोकांना कोरोनाची भीती वाटत होती. ऑक्टोबरमध्ये हेच प्रमाण ६२ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या