शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम मिळाले फुकट

By admin | Updated: October 29, 2014 18:32 IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनने नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ - महाराष्ट्रातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशनने या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे. शपथविधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम असल्याने आम्ही त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही असे स्पष्टीकरण एमसीएचे सचिव नितीन दलाल यांनी दिले आहे. 
महाराष्ट्रात भाजपाने प्रथमच सर्वाधिक जागांवर विजय मिळवत मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.  ३१ ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियममध्ये शाही थाटात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा जाहीर करुन भाजपाच्या मदतीला धावून येणा-या शरद पवारांनी शपथविधी सोहळ्यासाठीही भाजपावर कृपादृष्टी दाखवली आहे. शरद पवारांचे वर्चस्व असलेल्या एमसीएने  या सोहळ्यासाठी राज्य सरकारला वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. ही विनंती एमसीएने मान्य केली आहे. या सोहळ्यात सुमारे ३० हजार लोकं हजेरी लावतील अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सजावट करण्याची धूरा ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अशोक हांडे यांच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अंजली भागवत या दिग्गज खेळांडूसह साहित्य व कला क्षेत्रातील मंडळींनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.  यापूर्वी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात पडायचा. तर १९९५ मध्ये मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या युती सरकारचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पडला होता.