शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ नियम करून स्वातंत्र्य मिळत नाही, त्यासाठी चांगली कामगिरीही करावी लागते; सरकारचा उर्जित पटेलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 10:45 IST

फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे.

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य केवळ नियम तयार करून मिळणार नाही, तर त्यासाठी चांगली कामगिरी आणि निर्णय घेण्याची आवश्यकता असते, असे सांगत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले होते की, रिझर्व्ह बँक मर्यादांचे ओझे घेऊन वावरत आहे. घोटाळा झाल्यास सरकारी बँकांवर कारवाई करण्याबाबत रिझर्व्ह बँकेवर कमालीच्या मर्यादा आहेत. विविध कायद्यांमुळे कारवाई करता येणे अशक्य आहे, असे सांगत उर्जित पटेल यांनी हतबलता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना अरविंदर सुब्रमणियन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य हे केवळ नियम करूनच मिळत नाही. किंबहुना स्वातंत्र्य हे बहुतांशी  चांगल्या व प्रभावी निर्णयांची परंपरा आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या विश्वासर्हतेचा दाखला देता, तेव्हा केवळ स्वातंत्र्यच अभिप्रेत नसते. तुम्ही स्वतंत्र असाल आणि एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत असाल तर तुमची विश्वासर्हता रसातळाला जाऊ शकते. त्यामुळे फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे सुब्रमणियन यांनी म्हटले. त्यामुळे आता सुब्रमणियन यांच्या विधानावर उर्जित पटेल नेमकी काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उर्जित पटेल यांनी पूर्वसुरी रघुराम राजन यांच्या काळातही रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. सरकारकडून रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा