शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाडोत्री मातृत्वासाठी प्रतीक्षा काळ एक वर्ष करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:33 IST

लग्नानंतर सक्तीने पाच वर्षे प्रतिक्षा करायला लावणे अन्यायाचे असल्याने हा प्रतिक्षाकाळ कमी करून एक वर्ष करावा, अशी शिफारस संसदीय समितीने केली

नवी दिल्ली: भाडोत्री मातृत्वाने अपत्यप्राप्ती करून घेऊ इच्छिणाºया दाम्पत्यांना त्यासाठी लग्नानंतर सक्तीने पाच वर्षे प्रतिक्षा करायला लावणे अन्यायाचे असल्याने हा प्रतिक्षाकाळ कमी करून एक वर्ष करावा, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. भाडोत्री मातृत्वाचे नियमन करण्यासाठी करायच्या प्रस्तावित कायद्याचे सरकारने तयार केलेले विधेयक छाननी आणि सूचनांसाठी कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. त्यातील तरतुदींचा अभ्यास करून समितीने ही शिफारस केली आहे. विधेयकात सुचविलेला किमान पाच वर्षांचा सक्तीचा प्रतिक्षाकाळ हा संसतीहक्कांची पायमल्ली करणारा तर आहेच. शिवाय त्यामुळे कृत्रिक गर्भधारणेने अपत्यप्राप्तीची शक्यताही कमी होईल. पाच वर्षांचा सक्तीचा प्रतिक्षाकाळ मनमानी, भेदभाव करणारा व कोणत्याही रास्त तर्कावर आधारित नसल्याने तो कमी करून एक वर्ष करावा, असे समितीला वाटते.समिती म्हणते की, हल्ली वयाच्या तिशी आणि चाळीशीमध्ये लग्ने होतात ही वस्तुस्थिती आहे. त्यात आणखी नैसर्गिक प्रक्रियेने स्वत:चे मूल होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांना पाच वर्षे वाट पाहायला लावली, तर जेव्हा खरेच कृत्रिम गर्भधारणा करून येण्याची वेळ येईल, तेव्हा वय आणखी वाढलेले असेल. त्याने संकरासाठी उपलब्ध होणारे शुक्राणू व स्त्रीबीज चांगल्या दर्जाचे मिळणार नाही व परिणामी गर्भधारणेची शक्यता आणखी दुरापास्त होत जाईल.समिती म्हणते की, प्रजनन हा व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अन्य मार्गाने शक्य असूनही त्या व्यक्तीला मूल होण्यासाठी पाच वर्षे थांबायला सांगणे हा त्याच्या या हक्काचा संकोच करणे आहे. शिवाय याने पालकत्वही सक्तीने लांबविले जाईल.समितीला असेही वाटते की, भारतात वंध्यत्व हा सामाजिक कलंक मानला जातो. त्यामुळे मूल होऊ न शकणारी दाम्पत्ये मोठा मानसिक ताणतणाव व हेटाळणी सोसत असतात. शिवाय गर्भधारणा होणे किंवा न होणे हे दोघांच्याही हातात नसलेल्या अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याने, पाच वर्षांचा सक्तीचा प्रतीक्षा काळ अशा दाम्पत्यांच्या मानसिक त्रासात भर टाकणारा ठरेल.एवढेच नव्हे, तर स्त्रीला गर्भाशयच नसणे, असलेले गर्भाशय कर्करोगामुळे काढून टाकावे लागणे, गर्भाशयात फायब्रॉईड््स जमा होणे यासारख्या वैद्यकीय कारणांमुळे संततीप्राप्तीसाठी फक्त भाडोत्री मातृत्व हाच एकमेव पर्याय उपलब्ध असेल, अशा वेळी एक वर्षाचा प्रतीक्षा काळही माफ केला जावा, अशी समितीने शिफारस केली.>व्यापारीकरण रोखायला हवे; त्यासाठी कायदा प्रभावी असणे गरजचेदेशात भाडोत्री मातृत्वाचे व्यापारीकरण रोखायचे असेल, तर त्यासाठी केवळ हे ‘सरोगसी’ विधेयक मंजूर करून काही साध्य होणार नाही. भाडोत्री मातृत्वासाठी कृत्रिम गर्भधारणेच्या विविध तंत्रांचा आधार घेतला जातो. यासाठी असलेली ‘एआरटी क्लिनिक्स’च भाडोत्री मातृत्वाच्या केसेस हाताळत असतात. त्यामुळे या ‘एआरटी क्लिनिक्स’चे नियमन करणारे २००८ मध्ये मांडलेले विधेयक आधी मंजूर करून, तसा कायदा केल्याखेरीज ‘सरोगसी नियमन कायदा’ प्रभावी होणार नाही, असेही समितीने सुचविले आहे.