शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:59 IST

‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) २०३०’ अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित (कन्फर्म) करण्यात येणार आहेत. ‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे. ‘एनआरपी २०३०’मध्ये पायाभूत सुविधांची उभारणी आणि महसूलनिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ होईल. महसूलही वाढेल. देशातील एकूण मालवाहतुकीत ४७ टक्के हिस्सेदारी मिळविण्याची रेल्वेची योजना आहे. रेल्वे आणखी चार समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर २०३० पर्यंत उभारणार आहे. नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी-खाजगी भागीदारीत (पीपीपी) उभारले जातील. त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ कमालीचा कमी होईल. परिणामी मालवाहतुकीचे दर कमी करणे रेल्वेला शक्य होईल.रेल्वेच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमध्ये खाजगी मालवाहतूक गाड्या चालवण्याची रेल्वेची योजना आहे. नव्या धोरणात खाजगी क्षेत्राला आकर्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. २८०० कि.मी. लांबीचे पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर खाजगी गाड्यांसाठी खुले करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोलाद, लोह खनिज आणि वाहन या क्षेत्रातील कंपन्यांना आकर्षित करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे