शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक घोषणेची प्रतीक्षा वाढली

By admin | Updated: August 28, 2014 03:10 IST

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास आणखी एक-दोन आठवड्यांचा काही अवधी लागण्याची शक्यता आहे.

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीमहाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास आणखी एक-दोन आठवड्यांचा काही अवधी लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीची अधिसूचना २५-२६ आॅगस्टला जारी केली जाईल, अशी चर्चा होती. परंतु आॅगस्टमध्ये अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. अधिसूचना जारी होण्यासाठी आणखी एक-दोन आठवडे वा त्यापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, असे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी म्हटले आहे.लोकमतशी बोलताना ब्रह्मा म्हणाले, ‘या वर्षअखेर महाराष्ट्रासोबतच हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्यात येतील की वेगवेगळ्या तारखेला, हे अद्याप तरी ठरलेले नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.’याआधीची निवडणूक १३ आॅक्टोबर २००९ रोजी घेण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही निवडणुका आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्येच घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ९० सदस्यांच्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ २७ आॅक्टोबरला संपेल. तेथे महाराष्ट्रासोबतच १३ आॅक्टोबर २००९ रोजी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यावेळी हरियाणात आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. ८२ सदस्य संख्या असलेल्या झारखंडमध्ये विधानसभेची याआधीची निवडणूक ३ ते २४ नोव्हेंबर २००९ या काळात घेण्यात आली होती. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ १८ जानेवारी २०१५ रोजी संपेल. जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असून याआधी २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २००८ला सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. याचा कार्यकाळ १० जानेवारी २०१५ ला संपत असल्याने डिसेंबरअखेरीस निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता आहे.