शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१३०० शिक्षणसेवक प्रतीक्षेत

By admin | Updated: December 31, 2014 18:54 IST

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्य्

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्या दिल्या. उर्वरित १३६२ उमेदवारांना दोन महिन्यांमध्ये नियुक्त्या देण्याचे आश्वासन शिक्षण संचालनालयातील अधिकार्‍यांनी दिले होते. पण शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका पात्र उमेदवारांना बसत असून १३६२ उमेदवार आजही नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदांकडून प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याचे कारण शिक्षण संचालनालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यांच्याकडून तात्काळ माहिती मागवून १३६२ शिक्षणसेवकांना रिक्ताजागी पदस्थापना द्यावी, अशी मागणी डी.एड. सी.ई.टी.पुनर्मूल्यांकन पात्र उमेदवारांनी शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)