वाडी अपघात....
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
वाडी अपघात....
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठारनागपूर : अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना परिसरात मंगळवारी रात्री ९.२० वाजता घडली. किशोर बापूराव कन्हेरे (४५, रा. नागलवाडी, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. किशोर कन्हेरे हे आपल्या एमएच-४०/डब्ल्यू ८५६४ क्रमांकाच्या दुचाकीने वडधामना परिसरातून नागलवाडी येथे जात होते. दरम्यान, मार्गातील ताजने सभागृह परिसरात अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात किशोर हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी फिर्यादी आकाश किशोर कन्हेरे (२१) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर करीत आहेत. (प्रतिनिधी)