शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

व्यंकय्या नायडू होऊ शकतात उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

By admin | Updated: July 17, 2017 17:20 IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाही व्यंकय्या नायडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी चालवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाचे घटक पक्षही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवू शकतात. विशेष म्हणजे व्यंकय्या नायडूंच्या नावावर संघानंही सहमती दिल्याची चर्चा आहे. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेश म्हणजेच दक्षिणेतून येतात. तिथे भाजपाला चांगला असा जनाधार नाही. त्यामुळे दक्षिणेत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी भाजपाकडे याहून चांगली संधी नाही. सुरुवातीला भाजपा दक्षिणेतील कोणत्याही नेत्याला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवू शकते, अशी चर्चा होती. मात्र आता उपराष्ट्रपतिपदासाठी व्यंकय्या नायडू यांच्याहून योग्य चेहरा असू शकत नाही, असंही भाजपाच्या धुरिणांना वाटतं. व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे मोठा आणि जाणकार नेता म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.आणखी वाचा(राज्यपाल राव उपराष्ट्रपतीपदासाठी स्पर्धेत?)(उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नितीश कुमारांची मोदींना साथ ?)(अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?)येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीचा उमेदवार ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक आज सायंकाळी दिलीत बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास आणि माहिती व नभोवाणीमंत्री एम. व्यंकय्या नायडू हे या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे नावही चर्चेत असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

या सूत्रांनुसार पक्षात असा मतप्रवाह आहे की, उपराष्ट्रपतिपदासाठी दक्षिण भारतातील उमेदवार असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व राष्ट्रपतीपदाचे उमेदावर रामनाथ कोविंद उत्तरेकडील असल्याने उपराष्ट्रपतिपद देशाच्या दक्षिणेकडील राज्याकडे जावे, असे मत पक्षात तयार होत आहे.