शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 06:11 IST

मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. जगदीप धनकड यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येते. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होईल. पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्याबळाचा विचार केला, तर जगदीप धनकड यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येते. 

मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा (वय ८०) यांना उमेदवारी देताना सर्वांशी नीट चर्चा केली नव्हती, असा आक्षेप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. त्यामुळे मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय तृणमूूल काँग्रेसने घेतला आहे. तर टीआरएसने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा राजस्थानच्या माजी राज्यपाल, तर एनडीएचे उमेदवार व भाजप नेते जगदीश धनकड (वय ७१)  पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. धनकड हे राजस्थानातील जाट समुदायाचे नेते आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या शनिवारी, सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होईल. शनिवारी रात्रीपर्यंत विजेत्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. 

जगदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा रिंगणात

गुप्त मतदानाद्वारे निवडउपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन सभागृहांतील ७८८ सदस्य मतदान करतात. सर्व मतदार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असल्याने त्या खासदारांच्या मताचे मूल्य प्रत्येकी एक इतके असून, ते मत हस्तांतरणीय नसते, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकीत गुप्त मतदानपद्धती अवलंबिली जाते. 

फक्त संसद भवनातच होणार मतदानnउपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खुली मतदानपद्धती नसते. तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांत राजकीय पक्ष आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करू शकत नाहीत. nराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसद भवन व विविध राज्यांतील विधानसभांच्या विशिष्ट दालनांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध केली जाते. मात्र उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी फक्त संसद भवनाच्या दालनामध्येच मतदान होणार आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक