शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडू देशाचे नवीन उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 19:24 IST

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांचा विजय झाला आहे. त्यांना 516 मते मिळाली.

ठळक मुद्देउपराष्ट्रपतिपदासाठीचं मतदान संपलं असून आता सहा वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. 785 खासदारांपैकी 771 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.काळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

नवी दिल्ली, दि. 5-  राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते. 

एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला.व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली. 11 मते बाद गेली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान केले. 

मागच्या आठवडयात नितीश कुमारांनी काँग्रेस प्रणीत युपीएची साथ सोडून बिहारमध्ये भाजपासोबत आघाडी करुन सरकार स्थापन केले. नितीश कुमारांनी आधीच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. 

विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एकानिर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.

राज्यसभेत भाजपाला ‘बळ’लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.