शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

दिल्लीत आज मतदान; भाजप, आप अन् काँग्रेसची शक्ती पणाला

By admin | Updated: February 7, 2015 02:42 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली दिल्ली विधानसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आज शनिवारी पार पडत आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली दिल्ली विधानसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आज शनिवारी पार पडत असून चोख बंदोबस्तात १२,१७७ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १.३३ कोटी मतदार हक्क बजावत आहेत. ७० जागांसाठी होत असलेली ही निवडणूक केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीसाठी सार्वमत मानले जात असले तरी भाजपच्या नेतृत्वाने हा दावा फेटाळला आहे.देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर झेंडा फडकविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पुन्हा गमावलेला जनाधार परत मिळवत पक्षात पुन्हा जोश आणल्यामुळे काट्याचा संघर्ष होऊ घातला आहे. मोदींची प्रतिमा पणाला लागल्यामुळे भाजपनेही संपूर्ण ताकद झोकली आहे. एकूण ६७३ उमेदवार रिंगणात असून अनेक मतदारसंघात तिरंगी लढतींनी चुरस निर्माण झाली आहे. एकूण ७१४ मतदान केंद्रे संवेदनशील तर १९१ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.जुगार चालणार काय?१६ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या भाजपने टीम अण्णाच्या पूर्वाश्रमीच्या सदस्य किरण बेदी यांना थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ठरवत जुगार खेळला आहे. बेंदींच्या उमेदवारीने भाजपच्या तळागाळात असंतोष उफाळला असताना हा डाव साधला जाणार काय? असा सवाल राजकीय विश्लेषकांनी विचारला आहे. गेल्यावर्षी मे मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव काही अंशी कायम राहिला असला तरी मोदींची घोडदौड दिल्लीत थांबेल काय? याचे उत्तरही ही निवडणूक देणार आहे.भाजपची चिंता कायमनिवडणूक सर्वेक्षणांनी ‘आप’च्या झोळीत सत्तेचे माप टाकलेले दिसत असताना भाजपला पराभवाची चिंता लागलेली दिसून येते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हे सार्वमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अशाच प्रकारच्या विधानाबद्दल सारवासारव केली तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही सार्वमत ठरत नसल्याचे सांगत एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षणाची ढाल प्रदान केल्याचे मानले जाते. डिसेंबर २०१३ पर्यंत १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसची तिसऱ्या स्थानी पिछेहाट दाखविली जात आहे. किमान दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान या पक्षासमोर उभे ठाकले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) भाजपच्या जाहीरातीवरून वादंगभाजपने दिल्लीत शनिवारी मतदान होत असताना केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधणाऱ्या जाहिराती विविध वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्यामुळे आपने आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी दिल्लीतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भाजपच्या जाहिराती प्रसिद्धी झाल्या असून हे आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन असल्याचे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी म्हटले. वावगे काहीही नाही- आयोगाचा खुलासा४भाजपने दिल्लीच्या मतदारांना शनिवारी मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी त्यात चूक काहीही नाही. भाजपने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.बेदींनी लाटल्या पोळ्या, केजरीवालांचा योगाबेदींनी शुक्रवारी कृष्णनगर मतदारसंघातील एका गुरुद्वारात प्रार्थना केल्यानंतर स्वयंपाकगृहात जाऊन लंगरसाठी पोळ्याही लाटल्या. शीख मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न मानला जातो. दुसरीकडे आप नेते अरविंद केजरीवाल यांनी योगा केला. तसेच गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली. मोदींना पंतप्रधानपदावरून पदावनती करीत मुख्यमंत्रिपदात स्वारस्य असल्याचे दिसते. अन्यथा त्यांनी भाजप सरकारने आठ महिन्यांत जे काम केले नाही त्याच्या जाहिराती कशाला केल्या असत्या? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. आम आदमी पार्टीला एक तर आचारसंहितेच्या कायद्याची माहिती नसावी किंवा या पक्षाचे नेते केवळ बातम्यांचा विषय बनण्यासाठी अशा प्रकारची विधाने करीत असावेत. असे प्रत्युत्तर भाजपने दिले.सर्वाधिक १८, सर्वात कमी ४ उमेदवारउत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघात सर्वाधिक १८ तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघात सर्वात कमी ४ उमेदवार आहेत. २०१३ मध्ये ७१ महिला रिंगणात होत्या यावेळी कमी म्हणजे ६३ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे २९६ उमेदवार असून त्यापैकी १८३ उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे आहेत. तब्बल १९४ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीची रंगत वाढविली आहे.८६२ तृतीयपंथी मतदारदिल्लीत ७३,८९,०८९ पुरुष, ५९,१९,१२७ महिला तर ८६२ तृतीयपंथी असे एकूण १,३३,०९,०७८ मतदार आहेत.१८ ते १९ वर्षे वयोगटातील पहिलट मतदारांची संख्या २,२७,३१६ तर २० ते २९ वर्षे या युवागटातील ३६,९३,९७५ मतदार निर्णायक भूमिका बजावतील असे मानले जाते. विशेष म्हणजे शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या ३११ एवढी आहे. सर्वाधिक ३,४७,२४५ मतदार मतिया महल मतदारसंघात तर चांदणी चौकमध्ये सर्वात कमी १,१३,७७७ मतदार आहेत. ९३६९ मतदार बेघर आहेत. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ४१,०९५ टपाल मतपत्रिकांचा वापर झाला यावेळी ही संख्या ४३,२३५ असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्ट्रॉँगरुमसाठी चोख सुरक्षा१४ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा असेल.१६ हजार कंट्रोल युनिट २० हजार बॅलट युनिटवर १२०० मायक्रो आॅबझर्व्हर निगराणी ठेवून असतील. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. कंट्रोल रुमद्वारे लाईव्ह वेबकास्टिंग केले जाईल.