शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मतदारांना ‘आप’च्या दिल्लीतील ‘कामगिरी’ची भुरळ; मतदार म्हणतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 09:01 IST

गोव्यात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश गोव्याचे मतदार नाहीत; परंतु त्यांनीही गोव्यासाठी ‘आप’लाच पसंती दर्शविली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशातही आप बाजी मारेल, असे या परप्रांतीयांना वाटते.

राजेश निस्ताने -

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा प्रचारात उतरलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील कामगिरीची गोव्यातील मतदारांना भुरळ पडल्याचे चित्र आहे. पणजीच्या शहरी व ग्रामीण भागातील विविध घटकातील मतदारांसोबत चर्चा केली असता ‘आप’ बद्दल त्यांच्यात बराच विश्वास पाहायला मिळाला. आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उच्चशिक्षित असल्याचा जनतेला फायदा होईल, असे बहुतेकांना वाटते. 

‘आप’ ने दिल्लीत सरकारी शाळा, दवाखाने, मोफत वीज, पाणी, पायाभूत सुविधा आदी आघाड्यांवर केलेले काम गोवेकरांच्या मनात भरल्याचे दिसते. विकासाचा हाच पॅटर्न अरविंद केजरीवालगोवा राज्यातही राबवू शकतात, असे सामान्य नागरिकांना वाटते. गोव्यातील जनतेने काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षांच्या हाती अनेक वर्षे सत्ता दिली; पण विकासाचा वेग फारसा वाढला नाही. त्यामुळे एक संधी आम आदमी पक्षालाही देऊन पहावी, असा सामान्य गोवेकरांचा सूर आहे. अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील प्रचारात आणि जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा येथील मतदारांना चांगल्याच भावल्या आहेत. परप्रांतीयही ‘आप’वर खुश गोव्यात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश गोव्याचे मतदार नाहीत; परंतु त्यांनीही गोव्यासाठी ‘आप’लाच पसंती दर्शविली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशातही आप बाजी मारेल, असे या परप्रांतीयांना वाटते.

मतदार म्हणतात... काँग्रेसला अखेरची संधी -- गोव्यात काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती. गेल्या निवडणुकीसुद्धा मतदारांनी अधिक संख्येने म्हणजे १७ आमदार काँग्रेसच्या झाेळीत टाकले होते. परंतु, मुख्यमंत्री कोण? या मुद्द्यावर टाइमपास झाला आणि भाजपने डाव साधला.- गेली दहा वर्षे भाजपचे सरकार राहिलेल्या गोव्यात काही भागातील मतदार पुन्हा एकदा काँग्रेसला संधी देऊ इच्छितात. - यावेळी काँग्रेसकडून विलंबाची पुनरावृत्ती झाल्यास अथवा मतदारांनी नाकारल्यास काँग्रेसला गोव्यात ही अखेरची संधी असेल, असे मतदार मानत आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Arvind Kejriwalअरविंद केजरीवालgoaगोवा