शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मतदान ओळखपत्र : 17 वर्षांच्या तरुणांना ‘ॲडव्हान्स बुकिंग’ची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 08:46 IST

निवडणुकीत सहभाग वाढविण्यासाठी आयोगाचा निर्णय; वर्षातून तीन वेळा मिळणार संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. १७ वर्षे पूर्ण होताच तरुणांना मतदार ओळखपत्रासाठी आगाऊ अर्ज करता येईल. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. निवडणुकीत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात तरुण मतदारांची संख्या वाढणार आहे.

वर्षातून चार वेळा नोंदणीनिवडणूक कायद्यात बदल केल्यानंतर आता १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे चार वेळा मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मत देण्यासाठी अधिक वाट पाहावी लागणार नाही.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अगदी अलीकडेपर्यंत एक जानेवारी रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण झालेले लोक पात्र होते. एक जानेवारीनंतर १८ वर्षांचे होणाऱ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पूर्ण एक वर्षे वाट पाहावी लागत होती.

अपंगांना फायदाnअपंगांना घरी बसून अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे लागेल.nमतदान यादीमुळे नावासमोर अपंग शब्द लिहिण्यासाठी फॉर्म क्रमांक ८ भरता येईल. हे ऐच्छिक आहे.nअपंग मतदारांचा डेटा बूथ स्तरावर उपलब्ध होणार आहे.nअपंगांना मतदानासाठी केंद्रावर यामुळे त्रास होणार नाही.

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची तयारीनिवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी १ ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात येणार आहे. यात मतदार यादीत सहभाग असलेले प्रत्येक नाव आधार क्रमांक घेऊन लिंक केले जाणार आहे. यामुळे डुप्लिकेट नावे राहणार नाहीत. ज्या मतदारांकडे आधार क्रमांक नाही त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक