शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

कौतुकास्पद ! विरुष्का विकणार लग्नाचे फोटो, मिळणा-या पैशातून करणार समाजकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:47 IST

विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देविराट आणि अनुष्काने लग्नाचे फोटो विकून मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहेलवकरच विरुष्काच्या लग्नाचे फोटो एका मॅगजिनच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेतहे अमेरिकेतील एक प्रसिद्ध फॅशन मॅगजिन असणार आहे

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या तोंडी एक विषय हमखास आहे तो म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचा. दोघांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विरुष्का 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नातील प्रत्येक क्षण आणि बातमी मिळवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. लग्नाचे अजून काही फोटो समोर येतायत याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. पण लग्नातील हे फोटो काढण्यामागे विराट आणि अनुष्काचं एक खास कारण होतं. हे सर्व फोटो एका अमेरिकन मॅगजिनला विकण्यात येणार असून, मिळणारे पैसे दान म्हणून देण्यात येणार आहेत. 

विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लवकरच विरुष्काच्या लग्नाचे फोटो एका मॅगजिनच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध फॅशन मॅगजिन असणार आहे. विरुष्काच्या या निर्णयामुळे चाहते शुभेच्छांनंतर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

मुंबई आणि दिल्लीत जंगी रिसेप्शन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. सध्या विराट आणि अनुष्का रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इकडे त्यांचे कुटुंबिय मात्र रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त आहेत. विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं रिसेप्शन कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला बॉलिवूड आणि क्रिकेटर्ससाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनला मोठमोठे सेलिब्रेटी आणि क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत.  

अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहलीअनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं.  

टॅग्स :Virushka Weddingविरूष्का वेडिंगVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्मा