गुजरातच्याअहमदाबाद येथील नोबलनगर भागात बुधवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन चालकाने घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर कार घातली. सुदैवाने, या अपघातातून मुलगी थोडक्यात बचावली. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी घराबाहेर खेळत होती, त्याचवेळी, एक नंबर प्लेट नसलेली कार तिथे येते. चालकाचे मुलीकडे लक्ष जात नाही आणि तो कार थेट तिच्या अंगावर घालतो. जवळ असलेल्या लोकांनी आरडाओरड करताच चालक कार थांबवतो. सुदैवाने, या घटनेत मुलीला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, मुलगी चमत्कारिकरित्या कारखालून सुरक्षितपणे बाहेर पडताना आणि उभी राहताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, अहमदाबाद पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेतली आहे. अहमदाबाद पोलिसांनी त्वरित कारवाई करत अल्पवयीन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बीएनएस कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १७७, १८४, १८१ अंतर्गत ‘जी’ विभाग वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेमुळे पालकांमध्ये भिती पसरली आहे.
Web Summary : In Ahmedabad, a minor driver ran over a three-year-old girl playing outside. The car had no license plate. Fortunately, she survived with minor injuries. Police have registered a case against the underage driver.
Web Summary : अहमदाबाद में, एक नाबालिग ड्राइवर ने बाहर खेल रही तीन साल की बच्ची को टक्कर मार दी। कार पर नंबर प्लेट नहीं थी। सौभाग्य से, वह मामूली चोटों के साथ बच गई। पुलिस ने नाबालिग ड्राइवर के खिलाफ मामला दर्ज किया है।