शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सत्यः शहिदांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी खरंच मोबाइलमध्ये बिझी होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:30 IST

पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं.

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावरही बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसंदर्भात अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असताना दिसत आहेत.विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच राहुल गांधी फोनवर बोलत असल्याचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक मजकूरही लिहिला आहे. राहुल गांधी शहिदांना योग्य सन्मान देऊ शकत नाहीत. एकीकडे पूर्ण देश शहीद जवानांसाठी अश्रू ढाळत आहेत आणि राहुल गांधी श्रद्धांजली देण्याऐवजी फोनवर बिझी आहेत. Bharat Positive या फेसबुक पेजवरून राहुल गांधी श्रद्धांजली वाहत असतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही राहुल गांधी राहुल गांधी फोनवर बिझी असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केलं आहे. तसेच 3 लाखांहून अधिक युजर्सनं हा व्हिडीओ पाहिला आहे.  नेमकी खरी बाब काय ?राहुल गांधी यांनी श्रद्धांजली सभेत फोनचा वापर केल्याचं खरं आहे. परंतु शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून झाल्यानंतर त्यांनी फोनचा वापर केला होता.कशी केली खातरजमा? टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीच्या यू ट्युब चॅनलवर हा श्रद्धांजली सभेचा पूर्ण व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या 31 मिनिटांच्या 40व्या सेकंदाला राहुल गांधींनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यानंतर 31 मिनिटांच्या 57व्या सेकंदाला लष्करी अधिकाऱ्यांबरोबर राहुल गांधी रांगेत उभे होते. त्यानंतर 45मिनिटाच्या 35व्या सेकंदाला राहुल गांधींनी खिशातून फोन बाहेर काढला आणि मेसेज पाहिले. त्यावेळी त्यांच्या बाजूला लष्कर प्रमुख बिपीन रावत, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, निर्मला सीतारामण, राजनाथ सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिसत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSocial Viralसोशल व्हायरल