शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

हिंसक आंदोलनांमुळे लोकशाही बनते दुबळी - राष्ट्रपती कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:46 IST

राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खासदारांना धन्यवाद दिले.

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे होय, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्याच वेळी कोणतीही आंदोलने हिंसक पद्धतीने झाल्यास लोकशाही दुबळी बनत असल्याचेही राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी, शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत राष्टÑपती कोविंद यांचे अभिभाषण झाले. या दशकाच्या अखेरपर्यंत भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खासदारांना धन्यवाद दिले. भारताच्या विभाजनाच्या वेळी राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी तेथील हिंदू व शीख नागरिकांना भारतामध्ये कधीही येता येईल, असा शब्द दिला होता. संसदेने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा ही बापूजींच्या स्वप्नाची पूर्ती असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. देश सध्या राष्टÑपित्याच्या जयंतीचे १५०वे वर्ष साजरे करीत असतानाच हा कायदा झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होत असलेल्या विरोधाकडे लक्ष वेधतानाच, राष्ट्रपती कोविंद यांनी कोणतेही आंदोलन हे हिंसेच्या मार्गाने झाल्यास, त्यामुळे लोकशाही व्यवस्था दुबळी बनते, असे प्रतिपादन केले. आंदोलकांनी हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.राष्ट्रपतींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करताच, सत्ताधारी बाकावरील भाजपच्या सदस्यांनी जोरदारपणे बाके वाजवून त्यांचे स्वागत केले, तर कॉँग्रेस सदस्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या. या विधेयकाचा निषेध करण्यासाठी कॉँग्रेससह १४ विरोधी पक्षांचे सदस्य संसदेत काळ्या पट्ट्या बांधून आले होते.

भारतीय सैन्याला स्वयंपूर्ण करण्याकडे सरकारचे संपूर्ण लक्ष असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रपती म्हणाले की, सैन्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याला सरकार कटिबद्ध आहे. ही हत्यारे पुरेशा प्रमाणात असतील. सैन्यदल प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे तसेच सेनाविषयक विशेष विभाग सुरू करून तिन्ही सेनादलांमध्ये योग्य समन्वय राखण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे.देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचीही राष्ट्रपतींनी स्तुती केली. ‘गगनयान’ आणि ‘आदित्य १’ ही मिशन योग्य मार्गावर असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वाचून दाखविला. याप्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातील सहकारी, खासदार उपस्थित होते.देशवासीयांचे कौतुकअयोध्येतील मशिद-मंदिर वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशातील जनतेने जे सामंजस्य दाखविले, त्याबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांचे कौतुक केले.दहशतवाद झाला कमीकाश्मीरमधील नागरिकांच्या सहकार्यामुळे तेथील दहशतवाद आता बराच कमी झाल्याचे राष्टÑपतींनी सांगितले. तेथे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे अधिकार सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. त्यामुळेही दहशतवादावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे कोविंद म्हणाले. यादरम्यानच पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य समाजावर होत असलेल्या अत्याचाराची राष्टÑपतींनी कडक शब्दामध्ये निंदा केली. नुकत्याच नानकानासाहिब येथे झालेल्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधले.उज्ज्वल भविष्यासाठी स्वदेशीराष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उज्ज्वल भवितव्यासाठी देशातील जनतेने आजपासूनच स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात, असेही आवाहन केले. मोबाइलचे उत्पादन करणारा भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा देश आहे, असे नमूद करून ते म्हणाले की, देशातील उद्योजकांसाठी मुद्रा योजनेखाली १0 लाख कोटी मंजूर करण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांत अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी १00 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असे सांगून, पंतप्रधान किसान योजनेखाली आतापर्यंत ४३ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, याचाही आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदbudget 2020बजेटcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकEconomyअर्थव्यवस्था