शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

हरियाणात हिंसाचार सुरूच

By admin | Updated: February 21, 2016 03:46 IST

जाट आंदोलन चिघळल्यामुळे हरियाणात उफाळलेला हिंसाचार शमला नसून शनिवारी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. झज्जर आणि रोहतकमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी

चंदीगड : जाट आंदोलन चिघळल्यामुळे हरियाणात उफाळलेला हिंसाचार शमला नसून शनिवारी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. झज्जर आणि रोहतकमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले आहेत. त्यामुळे कालपासून आंदोलनात मरण पावलेल्यांची संख्या ८ झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिंदमध्ये एका रेल्वे स्थानकाला आग लावली; तर लष्कराने संचारबंदी लागू असलेल्या दोन जिल्ह्यांत ध्वजसंचलन केले. रोहतक जिल्ह्यात आंदोलकांनी रस्तेच खणून ठेवल्यामुळे लष्कराला हेलिकॉप्टरद्वारे तिथे धाडले. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-रोहतक आणि फजिलका महामार्गावर चक्काजाम केल्याने तिथेही हवाईमार्गे जवानांची कुमक येथे पोहोचविण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून, जाट समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणे शक्य असल्यास आपण निश्चितच तो निर्णय घेउ, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज पुन्हा सांगितले. त्यांनी आंदोलकांना हिंसक मार्गाचा अवलंब न करण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या या घोषणेने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. परिणामी आंदोलन लगेचच शांत होण्याची लक्षणे नाहीत. सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना २२ फेब्रुवारीपर्यंत सुटी जाहीर केली आहे.काही ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी संचारबंदी यांमुळे रस्ते व रेल्वे वाहतूक बंदच झाली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातून हरयाणामार्गे दिल्ली, पंजाब, जम्मूकडे जाणाऱ्या गाड्या एक तर रद्द करण्यात आल्या आहेत वा निघालेल्या गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. दिल्लीहून हरयाणात वा तेथून दिल्लीकडे रोज नोकरी, उद्योगासाठी येणाऱ्या मंडळींचे तर प्रचंड हाल होत आहेत. मारुती कंपनीने कारखाना बंद करून, कारचे उत्पादन थांबवले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी सकाळी जिंद जिल्ह्यातील बुढाखेडा रेल्वेस्टेशनला आग लावली. या आगीत येथील फर्निचर, रेकॉर्ड रुम आणि इतर सामान जळून खाक झाले. प्रशासनाने दिसताक्षणी गोळी मारण्याचे आदेश दिल्यावरही रात्रभर अनेक जिल्ह्यात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना सुरूच होत्या. हिसार, झज्जर, जिंद, कैथल आणि पानिपतमध्ये याची तीव्रता अधिक आहे.जाट आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते खोदून वाहतूक ठप्प पाडली आहे. लष्कराच्या एका ताफ्याला रस्ता खोदला असल्याने मदनखेरी गावाजवळच थांबावे लागले. राज्याच्या अनेक भागांत हिंसाचार सुरूच असून रोहतक, भिवानी, झज्जर आणि गुरगावमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोहतक आणि भिवानीमध्ये लष्कराने ध्वजसंचलन केले. राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याला सरकारचे प्राधान्य असून यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल,असे पोलीस महासंचालक यशपाल सिंघल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.पोलीस ठाणे आणि पेट्रोल पंप जाळलारोहतक येथून प्राप्त वृत्तानुसार जिल्ह्यातील मेहम गावात सुमारे दोन ते अडीच हजार लोकांच्या हिंसक जमावाने पोलीस ठाणे, पेट्रोल पंप आणि शासकीय इमारतींना आग लावली. भाजपच्या खासदाराचे घर जाळण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला. हिसारमध्ये एक मॉल पेटवण्याचे प्रयत्न हिंसक जमावाने शुक्रवारी रात्री केले.खट्टर यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलन मागे घेऊन राज्यात शांतता आणि कायदा-व्यवस्था कायम राखण्याचे तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली.जातीच्या आधारे फूट पाडण्याचा भाजपा, संघाचा डाव : काँग्रेसचा आरोपहिंसक आंदोलनासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असून, जातीच्या आधारे राज्यात फूट पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणावासीयांना राज्याच्या हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती शनिवारी केली. दिल्लीत पाण्याची चिंतादिल्लीला ६0 टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या मुनक कालव्यावरही आंदोलकांनी कब्जा प्रस्थापित केल्यामुळे अवघे दिल्ली शहर चिंतित असून, मुख्यमंत्री केजरीवालांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहांकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जाट आरक्षण आंदोलनामुळे रेल्वेला दररोज 200कोटींचे नुकसान सोसावे लागतेय. ७१६ ट्रेन्सवर या आंदोलनाचा विपरीत परिणाम झाला असून, 450 पेक्षा अधिक ट्रेन्स रद्द केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क /वृत्तसंस्था)