शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शेतकऱ्यांनी शेतात उभारली हत्तीची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 11:29 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे.

महासमुंद - शेतकरी शेतात राबून अन्नधान्य पिकवत असतात. मात्र अनेक ठिकाणी जंगलातील प्राणी त्यांच्या पिकांचं नुकसान करतात. हत्तींनी धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर येत असतात. हत्ती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करतात. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीची नासधूस करतो. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच देवाकडे प्रार्थना केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील कुकराडीह गावामध्ये शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हत्तींच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेताजवळ ही मूर्ती उभारली आहे. कुकराडीह गावात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान करत आहे. 

शेतकऱ्यांनी अनेकदा याबाबत सरकार आणि प्रशासनाला माहिती दिली. तसेच या समस्येवर काहीतरी मार्ग काढावा असे सांगितले. मात्र प्रशासनाने अद्याप काहीच उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी आता हत्तीची मूर्ती उभारून देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे. 'आम्ही विधिवत पूजा करून शेतामध्ये हत्तीची मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून आमच्या शेताचे रक्षण करेल. हत्तीची ही मूर्ती आमच्या संपूर्ण गावाचं रक्षण करेल असा विश्वास आहे' अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

हत्तींमुळे शेतीचे खूप नुकसान होत आहे. हत्तींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वन विभागाने म्हटलं आहे. मात्र कुकराडीह गावातील  शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच पूजा करून देवाकडे प्रार्थना केली आहे. गणपती बाप्पा हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी त्यांना आशा आहे. वनविभागचे अधिकारी मयांक पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही शेतकऱ्यांचा विश्वासाचा आदर करतो. हत्तींमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.' 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडFarmerशेतकरीagricultureशेती