शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यपूर्व भारतातील 'या' होत्या पहिल्या महिला मंत्री; देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रीय सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 10:05 IST

Vijaya Lakshmi Pandit : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना जाणून घेऊया, भारतीय महिला नेत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी. त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

भारताच्या राजकारणात आज महिलांचे स्थान खूप मजबूत झाले आहे. अलीकडेच देशाला द्रौपदी मुर्मूंच्या रूपाने दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. पण, जेव्हा भारत इंग्रजांचा गुलाम होता, तेव्हाही एक स्त्री राजकीय पद भूषवत होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासोबतच त्यांनी गुलामगिरीतील भारताच्या राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना जाणून घेऊया, भारतीय महिला नेत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी. त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या होत्या.

विजयालक्ष्मी पंडित कोण?विजयालक्ष्मी पंडित या स्वातंत्र्यपूर्व भारतातील सक्रिय राजकारणात सहभागी असलेल्या महिला नेत्या होत्या. लोक विजयालक्ष्मी पंडित यांना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण म्हणूनही ओळखतात. पण, भारताच्या स्वातंत्र्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, राजकीय कारकीर्द घडवण्यापूर्वी मुत्सद्दी म्हणून काम केले, ज्यात आणीबाणी लागू केल्याबद्दल भाची इंदिरा गांधी यांची निंदा करणे आणि राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणे यांचा समावेश होता.

जीवन परिचय अलाहाबादमध्ये १८ ऑगस्ट १९०० रोजी मोतीलाल नेहरू आणि स्वरूप राणी नेहरू यांच्या घरी विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म झाला. त्या जवाहरलाल नेहरूंपेक्षा अकरा वर्षांनी लहान होत्या. १९२१ मध्ये त्यांचा विवाह काठियावाड येथील प्रसिद्ध वकील रणजीत सीताराम पंडित यांच्याशी झाला. त्यांच्या मुलीचे नाव नयनतारा सहगल आहे. १९३२-१९३३, १९४० आणि १९४२-१९४३ या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना तीनदा अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तथापि, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारताच्या अनैच्छिक सहभागाला विरोध करण्यासाठी त्यांनी १९३९ मध्ये काँग्रेसमधील आपल्या सहकाऱ्यांसह राजीनामाही दिला होता. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन शिगेला पोहोचले असताना पंडित आणि त्यांचे पती दोघांनाही ब्रिटिशांनी अटक केली. जानेवारी १९४४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.

राजकारणात विजयालक्ष्मी १९३७ मध्ये त्या संयुक्त प्रांताच्या प्रांतीय विधानसभेची निवडणूक जिंकल्या. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री बनवण्यात आले. ज्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला ठरल्या. १९३८ पर्यंत आणि पुन्हा १९४६ ते १९४७ पर्यंत हे पद सांभाळले. १९४६ मध्ये त्या संयुक्त प्रांतातून संविधान सभेवर निवडून आल्या.

संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिलायाशिवाय १९४० ते १९४२ या काळात अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्या संयुक्त राष्ट्रात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. १९४७ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राजनैतिक सेवेत प्रवेश केला आणि १९४७ मध्ये त्यांची पहिली महिला राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४७ ते १९४९ पर्यंत सोव्हिएत युनियनमध्ये, १९४९ ते १९५१ पर्यंत युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोमध्ये, १९५५ ते १९६१ पर्यंत आयर्लंडमध्ये (या काळात त्या युनायटेड किंगडममध्ये भारतीय उच्चायुक्तही होत्या) आणि १९५८ ते १९६१ पर्यंत स्पेनमध्ये त्या भारताच्या राजदूत होत्या. १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. १९९० मध्ये विजयालक्ष्मी पंडित यांचे निधन झाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन