शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
4
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
5
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
6
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
7
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
8
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
9
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
10
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
11
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
12
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
13
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
14
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
15
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
16
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
17
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
18
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
19
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

गुजरातमध्ये विजय रुपानीचं मुख्यमंत्रिपदी कायम राहणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 4:21 PM

प्रेम कुमार धुमल यांच्या पराभवामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपासमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झालेला असला तरी, गुजरातमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता धुसर आहे.

ठळक मुद्दे150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपाला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले.2012 मध्ये 61 जागा जिंकणारी काँग्रेस 77 जागांपर्यंत पोहोचली.

अहमदाबाद - प्रेम कुमार धुमल यांच्या पराभवामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपासमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झालेला असला तरी, गुजरातमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता धुसर आहे. विजय रुपानीच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कायम रहातील असे फायनान्शिअल एक्स्प्रेसने म्हटले आहे. गुजरातमध्ये भाजपाने सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा ब-यापैकी घटल्या आहेत.  

150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपाला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले. 2012 मध्ये भाजपाने गुजरातमध्ये 115 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. 2012 मध्ये 61 जागा जिंकणारी काँग्रेस 77 जागांपर्यंत पोहोचली. पटेल मतदारांची नाराजी आणि आणखी दीडवर्षांनी 2019 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मोदींसारखी जनमानसाची पकड घेणा-या नेत्याची आज गुजरात भाजपाला आवश्यकता आहे. 

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गुजरातमध्ये घटलेला जनाधार  भाजपाला परवडणारा नाही. भाजपाने यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवली. दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदीसाठी अचानक स्मृती इराणी यांचे नाव चर्चेत आले होते. स्मृती इराणी गुजरातच्या पुढच्या मुख्यमंत्री बनू शकतात अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी चालवल्या होत्या. पण स्मृती इराणी यांनी हे वृत्त फेटाळून लावले. 

गल्लीतीली निवडणूक असेल तर माझे नाव तुम्ही ऐकाल. संसदीय समिती याबद्दल निर्णय घेईल. मी कुठल्याही स्पर्धेत नाही असे इराणी यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये सत्ता स्थापनेत भाजपाकडून उत्तर प्रदेशचे सूत्र अंमलात आणले जाऊ शकते. रुपानी यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेऊन दोन उपमुख्यमंत्री नेमले जाऊ शकतात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने योगीआदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवून दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत.                                                      

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017