शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्या यांनी ६,०२७ कोटींच्या कर्जाचा मोठा हिस्सा पाठविला विदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:11 IST

ब्रिटनला पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअर लाइन्ससाठी घेतलेल्या ६,०२७ कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा हिस्सा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून (सेल कंपन्या) विविध सात देशांत पाठविला असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : ब्रिटनला पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअर लाइन्ससाठी घेतलेल्या ६,०२७ कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा हिस्सा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून (सेल कंपन्या) विविध सात देशांत पाठविला असल्याची माहिती आहे. या माहितीच्या आधारे आता त्यांना भारतात परत आणण्याची तयारी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चालविली आहे.६१ वर्षीय मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअर लाइन्सकडे आयडीबीआय बँक आणि अन्य भारतीय बँकांचे ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज थकले आहे. त्यासाठी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. तथापि, या कारवाईतून वाचण्यासाठी मल्ल्या ब्रिटनला पळून गेले आहेत.सूत्रांनी सांगितले की, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाकडून घेतलेल्या कर्जाचा पैसा मल्ल्या यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सात देशांत पाठविला आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंड या देशांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, बनावट कंपन्या आणि सात देशांतील बँक खात्यांचा संबंध आम्ही हुडकून काढण्यात यश मिळविले आहे. यासंबंधी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंड या देशांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यातून तपास अधिका-यांना यासंबंधीचा आणखी तपशील मिळणार आहे.