शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दक्षता मात्रेने संसर्गतीव्रता कमी होणार, डॉ. बलराम भार्गव यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 08:01 IST

Coronavirus : डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणानंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती नऊ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत टिकून राहील, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोग्यसेवकांसह अन्य कोरोनायोद्धे तसेच एकाहून अधिक व्याधी असलेल्या ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना दक्षता मात्रा (प्रिकाॅशनरी डोस) दिल्याने संसर्गाची तीव्रता कमी होणार आहे. 

दक्षता मात्रेने प्रकृती चिंताजनक होण्याचे व मृत्यू यांचे प्रमाणही घटणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा व साठा यांच्या स्थितीबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एका बैठकीत आढावा घेतला. ऑक्सिजन टंचाई ओमायक्रॉनच्या संसर्गकाळात उद्भवू नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करत आहे. डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे.

डेल्टाविरोधात लढण्याची मिळणार ताकदओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज त्या व्यक्तीला डेल्टा विषाणूविरोधात लढण्याचीही प्रतिकारशक्ती देतात असे दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासात आढळून आले आहे. जगभरात ओमायक्रॉन संसर्गाबाबत झपाट्याने डेल्टाची जागा घेत आहे. तो डेल्टापेक्षा कमी घातक असल्याचे शास्त्रज्ञांचे मत असले तरी ओमायक्रॉनची संसर्गशक्ती मोठी आहे. त्यामुळेच हा विषाणू जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे करू शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन