शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:10 IST

जाणकारांच्या मते या बातमीचे फोटो आणि व्हिडीओंमुळे नागरिकांमध्ये बेचैनी वाढत आहे. यामुळे त्यांच्या मनावर गंभीर मानसिक आघात होऊ शकतो. याला सायकोलॉजिकल ट्रॉमा' असेही म्हणतात.

नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भयावह व्हिडीओ अजूनही सोशल मीडियामध्ये शेअर केले जात आहेत. या संदर्भातील बातम्यांचे प्रक्षेपण न्यूज चॅनलवर सतत सुरू आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे नागरिक हादरले आहेत. यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. पुनः पुन्हा हे पाहिल्याने लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जाणकारांच्या मते या बातमीचे फोटो आणि व्हिडीओंमुळे नागरिकांमध्ये बेचैनी वाढत आहे. यामुळे त्यांच्या मनावर गंभीर मानसिक आघात होऊ शकतो. याला सायकोलॉजिकल ट्रॉमा' असेही म्हणतात. (वृत्तसंस्था)

तज्ज्ञांचा सल्ला काय?

हे व्हिडीओ शेअर करणे थांबवा. मुलांना हे व्हिडीओ दाखवू नका. सुरक्षेबाबत दाखवल्या जात असलेल्या नकारात्मक बातम्यांपासून दूर राहा. कुटुंबासोबत चांगले अनुभव आणि आनंदी गोष्टी शेअर करा.

सर्च करणे थांबवा

अतिरेकी कारवाया याबाबत लोक मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर माहिती सर्च करीत आहेत. या माहितीसाठी सर्च करणे हे तुम्ही अस्वस्थ बनल्याचे लक्षण आहे. त्यामुळे हा कंटेट सर्च करणे थांबवावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

सुरक्षेबाबत चिंता

हे व्हिडीओ पाहून नागरिक सोशल मीडियात व्यक्त होत आहेत. याविरोधात सरकारने आता काहीतरी कारवाई करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. काश्मीरसंबंधी फोटो आणि व्हिडीओ पाहिल्याने लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. लोक आधीपेक्षा जादा चिंतेत आहेत.

अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचे व्हिडीओ वारंवार पाहिल्याने मन बेचैन होते. खूप राग येतो. हे थांबवण्यासाठी काहीतरी करावेसे वाटते. यामुळे अनेक तास मन अशांत होते. या व्हिडीओंचा मनावर परिणाम प्रत्यक्ष बंदुकीच्या बुलेटच्या हल्ल्याइतकाच होतो.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर