शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

Videocon-ICICI Case : ICICIच्या CEO चंदा कोचर यांच्या पतीची CBI करणार प्राथमिक चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 11:02 IST

सीबीआयकडून आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचरविरोधात कथित आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - सीबीआयकडून आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचरविरोधात कथित आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे. व्हिडीओकॉन समुहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरू केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या 9 लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत चंदा कोचर यांच्याही नावाचा समावेश आहे. वेणुगोपाळ धूत, दीपक कोचर आणि बँक अधिका-यांची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

डिसेंबर 2008 मध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी न्यू पॉवर रिन्यूएबल्स (एनआरपीएल) ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीत धूत यांच्याकडे 50 टक्के समभाग होते. तर दीपक कोचर यांच्या कंपनीकडे उर्वरित समभाग होते. पॅसिफिक कॅपिटल असे या कंपनीचे नाव असून या कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या वडिलांकडे आहे. तर चंदा कोचर यांच्या भावाची पत्नी देखील या कंपनीत सक्रीय आहेत.

जानेवारी 2009 मध्ये धूत यांनी एनआरपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीचे शेअर्स 2.5 लाख रुपयांमध्ये कोचर यांना विकले. मार्च 2010 मध्ये न्यू पॉवरला धूत यांची मालकी असलेल्या सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 64 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. यानंतर मार्च 2010च्या अखेरपर्यंत न्यू पॉवरमधील 94.99 शेअर्सचा वाटा सुप्रीम पॉवरकडे गेला.

दरम्यान,  कोचर कुटुंबीय आणि धूत यांच्यातील हे सर्व व्यवहार आणि बँकेचे बुडालेले कर्ज हे आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. जर या प्रकरणात सीबीआयला गुन्हा झाल्याची शक्यता वाटल्यास, संबंधितांवर गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Chanda Kochharचंदा कोचरICICI Bankआयसीआयसीआय बँक