शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Video - 'भाजपाला मत देणार नाही, तुम्ही आम्हाला वेडं समजलात काय?'; मोदींच्या सभेनंतर महिला संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 08:24 IST

PM Narendra Modi : महिलांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप देखील केले आहेत. हा व्हिडीओ सर्वसामान्यांपासून ते काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मातृशक्ती महाकुंभच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणी पंतप्रधानांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या महिलांना संबोधित केलं. यावेळी नवीन उत्तर प्रदेशला पुन्हा कधी अंधारात ढकलता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. मात्र मोदींच्या या सभेनंतरचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. 

महिलांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप देखील केले आहेत. हा व्हिडीओ सर्वसामान्यांपासून ते काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीमधून परतणाऱ्या महिलांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यानंतर या महिलांनी मोदी सरकारविरोधातील आपला संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे समजणं गरजेचं आहे की त्यांच्या सभेमधून महिला नाराज होऊन बनारसला जात आहेत. महागाई वाढवून मोदींनी आम्हा सर्वांना निराश केलं आहे, असं देखील महिला सांगताना दिसत आहेत.

"जनतेच्या समस्याच ऐकून घ्यायच्या नव्हत्या तर आम्हाला वाराणसीहून का बोलावलं?"

पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघामधून आलेल्या एका महिलेने, आम्ही भाजपाला मत देणार नाही असं सांगितलं. आम्हाला तुम्ही वेडं समजलात काय?, असा प्रश्नही संतापून  विचारला आहे. जर त्यांना जनतेच्या समस्याच ऐकून घ्यायच्या नव्हत्या तर त्यांनी आम्हाला वाराणसीहून का बोलावलं?, असा प्रश्न अन्य एका महिलेने विचारला आहे. गहू, तांदूळ, मीठ हे सर्व आता निवडणूक जिंकण्यासाठी दिलं जातं आहे. गरिबांसाठी ते काहीच करत नाहीत. यंदा आम्ही 100 टक्के त्यांना मत देणार नाही, असंही एका महिलेने म्हटलं आहे. 

"टीका केल्याबद्दल योगीजी त्यांच्यावर खटला नक्की दाखल करतील" 

माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींच्या सभेला आलेल्या महिलाच त्यांच्यावर एवढी टीका करत आहेत. या महिलांचे चेहरे ब्लर करायला हवे होते. या महिलांना त्यांचा हक्क तर नाही मिळाला पण टीका केल्याबद्दल योगीजी त्यांच्यावर खटला नक्की दाखल करतील असं सूर्य प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण