गुजरातमधील राजकोट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅटर्निटी हॉस्पिटलमधील प्रसूती वॉर्डमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडिया टेलिग्रामवर शेअर केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणालील वैभव बंडू माने, रायन रॉबिन परेरा आणि परीट धनश्यामभाई धामेलिया या तीन आरोपींना रिमांड सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. ते मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही हॅकिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होते. इतर ठिकाणांहूनही व्हिडीओ लीक झाले आहेत. सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'
आरोपीने हॅकिंग टूलचा वापर केला. नऊ महिन्यापासून त्याने ५० हजार व्हिडीओ चोरले आहेत. यामध्ये शाळा, कॉलेज, कंपन्या तसेच काही बेडरुममधील व्हिडीओंचा समावेश आहे. आरोपी धमेलियाने रुग्णालयातील सीसीटीव्ही सिस्टममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तीन वेगवेगळ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामचा वापर केल्याचा आरोप आहे. त्याने असुरक्षित आयपी अॅड्रेस आणि पोर्ट्सचा वापर करून प्रवेश मिळवला, यामुळे त्याला लाईव्ह सिक्युरिटी फुटेजवर नियंत्रण मिळाले.
विदेशातून हॅकिंग शिकला
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेले तिनही आरोपी सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करण्यात सहभागी होते. तांत्रिक विश्लेषण आणि मानवी बुद्धिमत्तेच्या आधारे त्यांना सांगली आणि सुरत येथून अटक करण्यात आली. आरोपीचे नाव परीट धामेलिया असे आहे. तो सुरतचा बी.कॉम. पदवीधर आहे. त्याने परदेशातून सीसीटीव्ही हॅकिंगचे प्रशिक्षण घेतले होते.महाराष्ट्रातील सांगली येथील संगणक विज्ञान विषयात बी.टेक करणारा वैभव माने, त्याने टेलिग्रामवर लीक झालेल्या फुटेजचे मार्केटिंग केले होते आणि महाराष्ट्रातील वसई येथील व्यवस्थापन अभ्यासाचा विद्यार्थी रायन परेरा, याने प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ विकल्याचा आरोप आहे.