शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : गृहमंत्र्यांचा धाडसी बाणा, आधी पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवलं मगच एअरलिफ्ट झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 23:26 IST

Video : दतिया जिल्ह्यातील गावाच बचाव कार्यासाठी गेलेले गृहमंत्री स्वत:च अडकून पडले होते. त्यामुळे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. तसेच, तेथे फसलेल्या नागरिकांनाही एअरलिफ्ट करण्यात आले.

ठळक मुद्देदतिया जिल्ह्यातील गावात मदत व बचाव कार्यासाठी गेलेले गृहमंत्री स्वत:च अडकून पडले होते. त्यामुळे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. तसेच, तेथे फसलेल्या नागरिकांनाही एअरलिफ्ट करण्यात आले.

भोपाळ - मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी पूरग्रस्त भागात आपला धाडसी बाणा दाखवून दिला. दतिया जिल्ह्यात पुरात अडकलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर, ते स्वत: हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे सुखरुप बाहेर पडले. या कामी वायूदलाची त्यांना मोठी मदत झाली. ज्या मोटारबोटच्या सहाय्याने मिश्रा गावात पोहोचले होते, त्या मोटारबोटीवर झाड कोसळले होते. त्यामुळे एक तार फसल्याने ती बोट पाण्यातच बंद पडली होती. दतिया जिल्ह्यातील गावात मदत व बचाव कार्यासाठी गेलेले गृहमंत्री स्वत:च अडकून पडले होते. त्यामुळे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. तसेच, तेथे फसलेल्या नागरिकांनाही एअरलिफ्ट करण्यात आले. कोटरा गाव आणि त्याजवळीलच गोरा चौकी भागात काही लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती, असे पोलीस अधीक्षक अमनसिंह राठोड यांनी सांगितलं. 

गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा हे स्वत: बोट घेऊन त्याठिकाणी पोहोचले होते. मात्र, या बोटीत एवढे लोकं नेणं धोक्याचं असल्याने गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टर बोलावले होते. हेलिकॉप्टर आल्यानंतर गृहमंत्र्यांनी सर्वप्रथम पुरात अडकलेल्या 7 लोकांना एअरलिफ्ट केले. त्यानंतर, ते स्वत: वायू दलाच्या जवानांच्या मदतीने सुखरुपपणे पाण्यातून बाहेर निघाले. यावेळी, गृहमंत्र्यांसमोरच एक वयोवृद्ध आजोबा मोठमोठ्याने रडू लागले होते. त्यावेळी, तुम्हाला आधी बाहेर काढेल, त्यानंतरच मी बाहेर जाईल, असा विश्वास डॉ. मिश्रा यांनी त्या आजोबांना दिला. त्यानुसार, कृतीही केली, असे गृहमंत्र्यांचे सचिव भगवत साहू यांनी सांगितलं. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या धाडसी बाण्याचे सध्या सोशल मीडियातून कौतुक होत आहे.   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfloodपूरHome Ministryगृह मंत्रालयministerमंत्रीindian air forceभारतीय हवाई दल