केदारनाथ (उत्तराखंड) - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा आपल्या शक्तीची चुणूक दाखवली आहे. जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले आहे.२०१८ मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडजवळ एका खांबाला आदळून हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातात लागलेल्या आगीत हे हेलिकॉप्टर जळाले होते. दरदम्यान, या हेलिकॉप्टरचा सांगाडा घटनास्थळावरच होता. अखेर दोन वर्षांनंतर चिनूकच्या मदतीने या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेण्यात यश मिळाले आहे.
VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले
By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 14:02 IST
Chinook helicopter News : जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले
VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले
ठळक मुद्देभारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा आपल्या शक्तीची चुणूक दाखवलीचिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले २०१८ मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडजवळ एका खांबाला आदळून हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता