शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Video: रामलीला मंचावर रामाच्या चरणी नतमस्तक झालेल्या हनुमानानं अचानक प्राण सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 23:01 IST

शहरातील जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेतर्फे राम राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भिवानी - हरियाणातील भिवानी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे रामलीलाच्या मंचावर हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या हरीश मेहता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रामलीला मंचावर सुरु असताना अचानक हरीश मेहता खाली कोसळले. सुरुवातीला लोकांना हा नाटकाचा भाग आहे असं वाटल्याने प्रत्येकजण राम नामाच्या जयघोषात तल्लीन झाले. मात्र खूप वेळ झाला त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शहरातील जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेतर्फे राम राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमानाची भूमिका करणार्‍या हरीश मेहता यांना रामाच्या चरणी नतमस्तक होताना मरण आले. बराच वेळ प्रेक्षकांना वाटले की हनुमान अजूनही पूजा करत आहेत. मात्र मंचावर उपस्थित लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट असून त्यांचे अश्रू थांबत नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत हरीश हे वीज विभागातून जेई पदावरून निवृत्त झाले होते. गेली २५ वर्षे ते हनुमानाची भूमिका करत होते. मंचावर ते रामजींच्या चरणी नतमस्तक झाले पण पुन्हा उठले नाहीत. त्यांना आंचल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांनी जीव गमवावा लागला होता असं कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या