राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केरळमध्ये एक मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे. पट्टनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवरील ज्या हेलिपॅडवर राष्ट्रपती मुर्मू असलेल्य वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने लँडिंग केले, तो हेलिपॅडचा काही भाग अचानक खचला. या घटनेमुळे काही वेळ धावपळ उडाली असली, तरी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, जमीन खचल्यामुळे हेलिकॉप्टर अडकले आणि त्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना हातभार लावावा लागला.
हेलिकॉप्टरचे वजन पेलले नाही?
२१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकेरळच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाल्या. आज त्यांचा सबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी पत्तनामथिट्टा येथे जाण्याचा कार्यक्रम होता. याच दरम्यान प्रमादम स्टेडियममध्ये ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या वजनामुळे हेलिपॅडचा काही भाग अचानक खाली खचला. या खकलेल्या भागात हेलिकॉप्टर अडकले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टर काढले बाहेर
हा अपघात घडताच तत्काळ सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी धावले. त्यांनी तत्काळ हेलिकॉप्टरला खचलेल्या भागातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये जवान आणि कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरला ढकलत ते सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे दिसत आहे.
Web Summary : A potential accident was narrowly avoided during President Murmu's Kerala visit when a helipad collapsed upon the Air Force helicopter landing. The helicopter became stuck, requiring police and firefighters to manually move it. No injuries were reported.
Web Summary : राष्ट्रपति मुर्मू के केरल दौरे के दौरान एक बड़ा हादसा टल गया। वायुसेना के हेलिकॉप्टर के उतरते ही हेलिपैड धंस गया, जिससे हेलिकॉप्टर फंस गया। पुलिस और दमकल कर्मियों ने मिलकर हेलिकॉप्टर को निकाला। कोई घायल नहीं हुआ।