शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने गाडी चालवली, पण बापाला बसला भुर्दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:35 IST

सार्वजनिक ठिकाणी असे स्टंट करने धोक्याचे असते.

नवी दिल्ली : वाहतुकीच्या नव्या नियमानुसार आता वाहन चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. पण, बऱ्याचदा असे होताना दिसत नाही. लखनऊमधील एका अल्पवयीन मुलाने गाडी चालविल्याचा फटका त्याच्या वडिलांना बसला आहे. या अल्पवयीन मुलाचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्यांच्या वडिलांना तीस हजार रुपयांचा दंड आकारला आहे.  

लखनऊमधील काकोरी पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शानू असे या आठ वर्षीय मुलाचे नाव आहे. शानू मोठ्या आत्मविश्वासाने गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये गाडी चालवताना शानूचे पाय जमिनीला सुद्धा पोहोचत नाहीत. अशा स्थितीत गाडीवर नियंत्रण आणण्यासाठी पाय जमिनीवर ठेवणे गरजेचे असते. पण, शानूसाठी हे धोकादायक होते. तसेच, सार्वजनिक ठिकाणी असे स्टंट करने धोक्याचे असते. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. 

शानूचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा नंबर पाहून गाडीचे मालक म्हणजेच शानूचे वडील यांना ताब्यात घेतले आणि वाहतुकीच्या नव्या नियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. नव्या नियमानुसार, अल्पवयीन मुलांनी गाडी चालविल्यास 25 हजार रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच, पालकांनी मुलांना वाहन चालविण्याची परवानगी दिल्यामुळे 5 हजार अतिरिक्त दंड आकारला जातो. त्यामुळे शानूच्या वडिलांना पोलिसांनी एकूण 30 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल