शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विदर्भ- राज्य महत्वाचे

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

राज्य पानासाठी सारांश

राज्य पानासाठी सारांश

अपंग कर्मचाऱ्याला
हायकोर्टाचा दिलासा
नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत नागपूरच्या अपंग कर्मचाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे.
अमूल्य पाटील असे कर्मचाऱ्याचे नाव असून ते कार्यालय सहायक आहेत. त्यांची २००७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठात शाखा सहायकाची २१ पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय झाला होता. तीन टक्के पदे अपंग कर्मचाऱ्यांसाठी राखीव होती.

रेल्वेगाड्या १६ तास विलंबाने
नागपूर : दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारीही विस्कळीत होती. नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. नवी दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक मागील पाच दिवसांपासून विस्कळीत झाली आहे.

राज्य शासनाचे अपील खारीज
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर येथील हत्याप्रकरणाशी संबंधित राज्य शासनाचे अपील फेटाळून लावले आहे.
मृताचे नाव शालिनी होते. तिचा घटनेच्या पाच वर्षांपूर्वी आरोपी बाळू बंसीधर मेश्राम (५०) याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना अपत्य नव्हते. ८ जानेवारी १९९८ रोजी शालिनीचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी २९ एप्रिल २०१३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला ४९८-अ (हुंड्यासाठी छळ), ३०४ (हुंडाबळी) व ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या दोषारोपातून निर्दोष मुक्त केले होते.
रिचार्जसाठी पैसे न दिल्याने आईला मारहाण
अमरावती : मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने आईला काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना २४ डिसेेंबर रोजी कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अंजनवती येथे घडली. रवींद्र मधुकर मस्के असे आरोपीचे नाव आहे. कमला मधुकर मस्के यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
कस्तुरबा रुग्णालयाच्या गोदामातून साहित्याची चोरी
वर्धा- सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी पंख्यासह विविध साहित्य चोरुन नेले. याबाबत सुनील जानराव कोल्हे यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या साहित्यात ४८ पंखे, पाच किलो तांब्याची तार, पेन्चीस सेट व अन्य साहित्य आहेत. यात रूग्णालयाचे एकूण साडेअकरा हजार रुपये नुकसान झाल्याचे तक्रारीत नोंदविले आहे.
जि.प. अभियंता अद्यापही फरारच
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कोरची येथे कार्यरत असलेला अभियंता अरविंद चव्हाण याचेविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यादिवशी पासून अभियंता चव्हाण पसार झाला असून एसीबीची तीन पथके त्याच्या मागावर फिरत आहेत.
वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील शेतकरी कापूस वेचणी करत असताना, वाघाने हल्ला केला. यात अरुण ताणाजी मडावी (४५) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.