शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत!

By मयुरेश वाटवे | Updated: April 15, 2024 05:42 IST

थिरुअनंतपुरमचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. शशी थरुर हे काँग्रेसच फायरब्रँड नेते

मयुरेश वाटवे, लोकमत न्यूज नेटवर्क थिरुअनंतपुरम : थिरुअनंतपुरमचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. शशी थरुर हे काँग्रेसच फायरब्रँड नेते. अनेक कारणांसाठी ते सतत चर्चेत असतात. यंदा त्यांच्याविरोधात भाजपने मोदी सरकारमधील कौशल्य विकास आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना उतरवल्याने केरळमधील या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. राजीव चंद्रशेखर राज्यसभा खासदार आहेत. सीपीआयचे पन्नायन रवींद्रन तिसरे उमेदवार आहेत. ते २००५ मध्ये सीपीआयतर्फे खासदार म्हणून निवडून गेले होते. कष्टकरी समाजाचा आवाज म्हणून ते परिचित आहेत. 

गेल्या वेळी थरूर यांच्या विरोधात भाजपचे कुम्मानन राजशेखरन यांनी निवडणूक लढवली होती. लाखभर मतांच्या फरकाने थरूर ही निवडणूक जिंकले होते.  लाखभर मतांचा हा फरक राजीव चंद्रशेखर भरून काढू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपने अनेक राज्यातील मंत्र्यांना, राज्यसभा खासदारांना या वेळी लोकसभा निवडणुकांत उतरवण्याचे ठरवले आहे. राजीव चंद्रशेखर हे त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात स्मृती इराणी यांनी घडवलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती चंद्रशेखरही  करतात का हे पाहावे लागेल.

केरळ हा सीपीआयचा गड असला तरी गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत लोकसभेत थिरुअनंतपुरम जागा त्यांना हुलकावणी देत आहे. यंदा त्यांनी २००५ साली या मतदारसंघातून जिंकलेल्या पन्नायन रवींद्रन यांना मैदानात उतरवले आहे. गेल्यावेळी सी. दिवाकर यांनी सीपीआयतर्फे निवडणूक लढवली होती. ते अडीच लाख मतांसह तिसऱ्या स्थानी गेले होते.

मुद्दे आणि गुद्देचंद्रशेखर मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवत असल्याचा थरूर यांचा आरोपथरूर आपल्याविरुद्ध बदनामीकारक प्रचार करत असल्याचा चंद्रशेखर यांचा दावाथरूर यांचे दावे आचारसंहितेचा भंग करणारे चंद्रशेखर यांचे मतआपले आरोप थरूर यांनी मागे घ्यावेत आणि माफी मागावी अशी चंद्रशेखर यांची मागणी आहे.

हे ठरताहेत प्रचाराचे मुद्दे- राज्यातील बेरोजगारी, गृहनिर्माण अशा प्रमुख समस्या चर्चेचा मुद्दा ठरत आहेत.- त्याचबरोबर सीएए, मणिपूर हिंसाचार हे राष्ट्रीय मुद्देही तापवण्यात येत आहेत.

२०१९ मध्ये काय घडले? शशी थरुर काँग्रेस (विजयी) ४१६१३१ कुम्मानन राजशेखरन भाजप ३१६१४२

२०१९ पूर्वी कोणाची बाजी२००९,२०१४, २०१९ शशी थरुर काँग्रेस२००५ पन्नायन रवींद्रन सीपीआय (पोटनिवडणूक)२००४ पी. के. वासुदेवन नायर सीपीआय१९९९ व्ही. एस. सिवकुमार काँग्रेस

प्यार का ‘नोटा’ तेरा...२०१९ साली उमेदवारांनी लाखांच्या आकड्यात मते मिळवली असली तरी चौथ्या क्रमांकाने ४५८० मते मिळाली होती.  या क्रमांकावरील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. कारण चौथ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ने मिळवली होती.

टॅग्स :Keralaकेरळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashi Tharoorशशी थरूर