१३ पैकी १२ जागा पटकावल्याम्हाळसाकोरे : येथील चेअरमनपद व सोसायटीची इमारत यामुळे वादग्रस्त ठरलेल्या विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत नि.सा.का. संचालक दौलतराव मुरकुटे व सरपंच बबनराव मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली असणार्या म्हाळसादेवी पॅनलने १३ पैकी १२ जागा वर विजय मिळवुन विरोधी स्वामी समर्थ पॅनलचा दणदणीत पराभव केला. स्वामी समर्थला निसटत्या ४ मताने केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तरी केवळ ४, ५, ६ अशा मतांनी ३ जागा गमवाव्या लागल्या. म्हाळसादेवी पॅनलमध्ये मुरकुटे या सर्वाधिक मतदार संख्या असणार्या कुणाला ५ जागा मिळाल्याने व प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणुक दौलतराव मुरकुटे यांनी एकहाती जिंकुन अपली सोसायटीतील सत्ता कायम राखली असली तरी किरकोळ मतांनी ३ ते ४ जागा मिळाल्याने अत्मपरीक्षणाचा सल्ला मतदारना दिला आहे. व एक जागेचा पराभवही बरेच काही सांगुन जात आहे. सभापती पदाची दौलतराव मुरकुटे हेच प्रबळ दावेदार आहे. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे कंसात मिळालेली ते - सर्वसाधारण गट - दौलतराव मुरकुटे (३३१) अण्णा मुरकुटे (३१५), तुकाराम हाडपे (३०६), रामदास मुरकुटे (३०५), मुरलीधर मुरकुटे (२९३), बाळु ढोबळे (२८७), विठ्ठल वाळके (२७८), रभाजी चकोर (२७५), महिला - शकुंतला मुरकुटे (२८०), हिराबाई गुंजाळ (२७९), अनु. जाती - शिवाजी पठारे (३२८), इमाउ - सुनील राउत (३०५), वि.जा.भ - नवनाथ नागरे (२७७), बाद मतदान
म्हाळसाकोरे सोसायटीवर म्हाळसादेवी पॅनलचा विजय
By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST