शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Vice Presidential Election Live: व्यंकय्या नायडू विरुद्ध गोपाळकृष्ण गांधी, पंतप्रधान मोदींनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 14:49 IST

उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

नवी दिल्ली, दि. 5 - उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत असली तरी, नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदानासाठी संसदेत सदस्य दाखल होते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले आहे. 

 

व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया

मतदानापूर्वी रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मी कुणाही विरोधात लढत नाहीय आणि आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढत आहे आणि अनेकांनी मला समर्थन दिले आहे. त्यामुळे  ते सर्व निवडणुकीत मतदान करतील असा विश्वास आहे. 

मतदान प्रक्रियाउपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतात. यावेळी बॅलेट पेपर कोणत्या प्रकारचे निवडणुकीचे चिन्ह नसते तर उमेदवाराचे नाव तेथे असते. एका विशेष प्रकारच्या शाईचा मतदानासाठी वापर केला जातो.  

लोकसभेत बहुमत असलेल्या रालोआचे उमेदवार नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा आहे. गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचे समर्थन करणा-या बीजू जनता दल आणि जदयूने उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला आहे. जदयूने बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत राज्यात नवे सरकार स्थापन केले. पण, पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय बदललेला नाही.

आज सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होणा-या मतदान प्रक्रियेत संसद सदस्य आपल्या पसंतीचे मत देण्यासाठी विशेष प्रकारच्या पेनचा उपयोग करतील. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले की, मतदानानंतर तत्काळ मतमोजणी होणार आहे आणि रात्री सातपर्यंत निकाल हाती येतील. विशेष म्हणजे राजकीय पक्ष या निवडणुकीत व्हिप जारी करू शकत नाहीत. कारण, मतदान गोपनीय पद्धतीने होते.

विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एकानिर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.

राज्यसभेत भाजपाला ‘बळ’लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.